IPL 2024 DC vs LSG Match Live | दिल्ली कॅपिटल्सचा लखनऊवर 19 धावांनी विजय; निकोलस पूरण आणि अखिलेश खानची झुंज एकाकी | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेटMay, 14 2024

दिल्ली कॅपिटल्सचा लखनऊवर 19 धावांनी विजय; निकोलस पूरण आणि अखिलेश खानची झुंज एकाकी

द्वारा- Yuvraj Bhagat
21:26 PMMay 14, 2024

कर्णधार ऋषभ पंत नवीन उल हककडून बाद झाल्यानंतर ट्रिशन स्टब्सने लखनऊच्चा गोलंदाजांना धुवून काढले. स्टब्सने अवघ्या 25 चेंंडूत 57 धावा केल्या त्याने दमदार खेळी करीत अर्धशतक ठोकले. दिल्लीच्या 20 ओव्हरमध्ये 208 धावा झाल्या आहेत.

IPL 2024 DC vs LSG मॅच LIVE : प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दिल्लीची सुरुवात काही निराशाजनकच झाली. त्यांचा आक्रमक फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्क आज शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीला आलेल्या अभिषेक पोरेलने संघाची कमान हातात घेत दमदार फटकेबाजी करीत 33 चेंडूत 58 धावा केल्या. त्यानंतर शाई होपने 27 चेंडूत 38 धावा केल्या. अभिषेक पोरेल नवीन उल हकच्या चेंडूवर बाद झाला. आता कर्णधार रिषभ पंत आणि ट्रिशन स्टब्स खेळत आहे.

 

स्कोअर अपडेट : IPL च्या 17 व्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना खेळला जात आहे. या मोसमातील उभय संघांमधील ही दुसरी लढत आहे. यापूर्वी ते १२ एप्रिलला आमनेसामने आले होते. त्यानंतर दिल्लीने अवघ्या 18.1 षटकांत 5 विकेट्स राखून सामना जिंकला होता.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना खेळला जात आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे, ज्यामध्ये लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात दिल्लीने 2 गडी गमावून 100 हून अधिक धावा केल्या आहेत. अभिषेकने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले.

दिल्ली आणि लखनौ यांच्यातील या मोसमातील हा दुसरा सामना आहे. याआधी 12 एप्रिल रोजी लखनऊच्या एकना स्टेडियमवर ते आमनेसामने आले होते. त्यानंतर दिल्लीने अवघ्या 18.1 षटकांत 5 विकेट्स राखून सामना जिंकला होता.

दिल्ली आणि लखनौ या दोन्ही संघांसाठी ही करा किंवा मरो स्पर्धा आहे. आतापर्यंत दिल्लीने 13 पैकी 6 सामने जिंकले असून लखनौने 12 पैकी 6 सामने जिंकले आहेत. समान 12 गुणांसह, दिल्ली संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि लखनौ 7 व्या स्थानावर आहे. दिल्लीने हा सामना गमावल्यास ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर लखनौला आणखी एक संधी मिळेल.

दिल्लीविरुद्ध लखनौचा वरचष्मा

आयपीएलमधील लखनौ संघाचा हा केवळ तिसरा हंगाम आहे. 2022 मध्ये त्यांनी प्रवेश केला होता. अशा परिस्थितीत, लखनऊ आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत लखनौ सुपर जायंट्स संघाने 3 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने एक सामना जिंकला.

दिल्ली विरुद्ध लखनौ हेड-टू-हेड

एकूण सामने: ४
लखनौ जिंकले: ३
दिल्ली जिंकली: १

लखनौ-दिल्ली सामन्यातील हा प्लेइंग-11

दिल्ली कॅपिटल्स : जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक सलाम दार, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि खलील अहमद.

इम्पॅक्ट उप : इशांत शर्मा, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, स्वस्तिक चिकारा आणि ललित यादव.

लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, युधवीर सिंग, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि मोहसिन खान.

इम्पॅक्ट सब : मणिमरन सिद्धार्थ, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, प्रेरक मंकड आणि अमित मिश्रा.

OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.