IPL 2024: Focus on Kohli's performance! Lucknow Super Giants challenge Royal Challengers Bangalore today

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाशी होणार आहे. या वेळी बंगळुरुचा प्रयत्न आपली कामगिरी उंचावण्याचा राहणार आहे. यामध्ये किंग कोहलीच्या कामगिरीवर विशेष लक्ष्य असणार आहे.

  बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या हंगामात प्रथम फलंदाजी करताना दोन सामने गमावले आहेत आणि टार्गेट गाठताना एक जिंकला आहे. परिणामी, आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्यातही, संघाच्या गोलंदाजी संसाधनांवर आता परिचित प्रश्नचिन्ह आहेत. या संघामध्ये हे जमिनीच्या अक्षम्य स्वरूपाचे उत्पादन आहे हे चांगले दस्तऐवजीकरण केलेले आहे. ते सांगितलेले तोटे कसे भरून काढू शकतील याचे उत्तर देणे बाकी आहे, आणि लखनऊ सुपर जायंट्सशी सामना करताना त्यांना भेडसावणाऱ्या अनेक आव्हानांपैकी एक असेल, ज्यांनी त्याच ठिकाणी मागील हंगामात त्यांच्यावर रोमहर्षक विजय मिळवला होता.

  बंगळुरुचा प्रयत्न आपली कामगिरी उंचावण्याचा

  आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यास अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाशी होणार आहे. या वेळी बंगळुरुचा प्रयत्न आपली कामगिरी उंचावण्याचा राहील. बंगळुरुचा संघ तीन सामन्यांनंतर दोन गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. गेल्या सामन्यात त्यांना कोलकाता नाइट रायडर्सकडून त्यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागल्याने त्यांच्या निव्वळ धावगतीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे संघाला लखनऊविरुद्ध कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.

  बंगळुरुला चांगली संधी

  घरच्या मैदानावर सामना असल्याने सामना होत असल्यानेन बंगळुरुला चांगली संधी आहे. दुसरीकडे, लखनऊ संघ दोन सामन्यांमध्ये एका विजयासह सहाव्या स्थानी आहे. बंगळुरुविरुद्ध विजय मिळवल्यास त्यांना गुणतालिकेत बढती मिळू शकते. मात्र, त्याकरिता संघाला एकत्रितपणे कामगिरी उंचावणे अपेक्षित आहे.

  पूरन, डीकॉककडून अपेक्षा
  लखनऊचा कर्णधार केएल राहुलच्या तंदुरुस्तीबाबत चिंता कायम आहे. त्यामुळे संघ त्याचा उपयोग ‘प्रभावी खेळाडू’च्या रूपाने करीत आहे. त्याच्या अनुपस्थितीत निकोलस पूरन संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे या सामन्यात राहुल कर्णधाराची भूमिका सांभाळतो का, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. राहुलच्या स्थितीमुळे पूरन व क्विंटन डीकॉक यांच्यावर धावा करण्यासाठी अधिक दबाव असेल. त्यांना देवदत्त पडिक्कल व मार्कस स्टोइनिस यांची साथ अपेक्षित आहे. गेल्या सामन्यात लखनऊच्या मयांक यादवने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे चिन्नास्वामी स्टेडियमवरही त्याच्याकडून या कामगिरीची अपेक्षा असेल. गेल्या सामन्यात रवि बिश्नोईने निराशा केली, मात्र या सामन्यात त्याला कामगिरी उंचवावी लागेल.
  बंगळुरुची मदार फलंदाजांवर
  फॅफ डय़ुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील बंगळुरुच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. मात्र, त्यांच्या खेळाडूंना कामगिरी सातत्यता राखणे गरजेचे आहे. बंगळुरुकडून विराट कोहलीशिवाय इतर फलंदाजांना चमक दाखवता आलेली नाही. बंगळूरुला चांगली कामगिरी करायची झाल्यास डय़ुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांना योगदान द्यावे लागेल. आघाडीच्या फलंदाजांना योगदान न देता आल्याने दिनेश कार्तिक, अनुज रावत व महिपाल लोमरोर यांच्यावर संघाला अवलंबून रहावे लागत आहे. पाटीदारची खराब लय कायम आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघ युवा खेळाडूंना संधी देऊ शकते. गोलंदाजांचे योगदानही संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.