IPL 2024 LSG vs DC Match Live | लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; 3 ओव्हरमध्ये 28 धावांवर 1 विकेट; वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट2 महीने पहले

लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; 3 ओव्हरमध्ये 28 धावांवर 1 विकेट; वाचा सविस्तर

ऑटो अपडेट
द्वारा- Yuvraj Bhagat
20:46 PMApr 12, 2024

12 ओव्हरमध्ये लखनऊच्या 6 विकेट गमावून 94 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आज चांगली गोलंदाजी करीत लखनऊला चांगलेच रोखून धरले आहे.
20:16 PMApr 12, 2024

कर्णधार केएल राहुलने संयमी खेळी करी लखनऊच्या धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे लखनऊच्या विकेट जाणे सुरूच आहे. स्टोयनिसची विकेट गेली आहे. स्टोयनिस 8 विकेटवर तंबूत परतला आहे.

IPL 2024 LSG vs DC : भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर या हंगामातील 26 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना, 3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 30 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघात बदल
लखनऊ आणि दिल्ली दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. लखनऊने एक बदल केला आहे. मयंक यादव बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अर्शद खान याला संधी देण्यात आली आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सने 2 बदल केले आहेत. मुकेश कुमार आणि कुलदीप यादव या दोघांचं कमबॅक झालं आहे. या सामन्यानिमित्ताने लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघांची यंदाच्या मोसमातील कामगिरी कशी आहे? हे जाणून घेऊयात.

लखनऊ आणि दिल्लीची कामगिरी
लखनऊ सुपर जायंट्सने केएल राहुल याच्या नेतृत्वात आतापर्यंत या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. लखनऊने शेवटच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्सचा विजयी ट्रॅकवर प्रयत्न असणार आहे. यंदा दिल्लीने ऋषभ पंतच्या नेतृत्वात निराशाजनक कामगिरी केली आहे. दिल्लीने चेन्नई सारख्या मजबूत संघाविरुद्ध एकमेव सामना जिंकला. मात्र 4 सामन्यात दिल्लीला पराभूत व्हावं लागलं. लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या 10 व्या स्थानी आहे.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि यश ठाकुर.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.