IPL 2024 MI vs SRH Live Score | .....अखेर अन्शुल कंबोजला मिळाली पहिली विकेट; मयंकला 5 धावा करून पाठवले तंबूत; SRH 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 88 धावा, पाहा लाईव्ह अपडेट | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट24 दिन पहले

…..अखेर अन्शुल कंबोजला मिळाली पहिली विकेट; मयंकला 5 धावा करून पाठवले तंबूत; SRH 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 88 धावा, पाहा लाईव्ह अपडेट

ऑटो अपडेट
द्वारा- Yuvraj Bhagat
20:35 PMMay 06, 2024

सनरायझर्सला चौथा धक्का बसला आहे. नितीश रेड्डी हार्दिकच्या शॉट बॉलला मारण्याच्या नादात सोपा झेल देऊन बाद झाला. अन्शुलने झेल पकडत नितीश रेड्डीला तंबूचा रस्ता दाखवला.
20:30 PMMay 06, 2024

पियूष चावला आला आणि त्याने ट्रविस हेडला गुंडाळले. एका चेंडूवर जोरदार फटका मारण्याच्या नादात लॉंग अॉफला टिळक वर्माला सोपा झेल देत तंबूचा रस्ता धरला.

IPL 2024 MI vs SRH Live : वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स सामन्यात MI ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या हंगामात सनरायझर्स अंदाज काही वेगळाच होता. तर दुसरीकडे मुंबईने 11 सामन्यांपैकी केवळ 3 विजय प्राप्त केले आहेत. मुंबई या हंगामात प्लेअॉफमधून जवळजवळ बाहेर पडले असल्याचे दिसून येत आहे. तरीही मुंबईला येथून कमबॅक करायचे म्हटले तर खूप मेहनत करावी लागणार आहे.

मुंबईला पॉवर प्लेमध्ये विकेटची गरज होती आणि ती बुमराहने पूर्ण केली. बुमराहच्या चेेंडू अभिषेक इशांत किशनला सोपा झेल देत बाद झाला.

 

आज MI गोंधळात दिसत असली तरी त्यांनी संघात दोन बदल केले आहेत. एक तर अंशुल कंबोजने डेब्यू केला आहे. आणि नमन धीरसुद्धा खेळत आहे. दोन सलामीवीरांना आऊट वॉक असणार आहे. तुषाराच नवीन चेंडू घेईल असे दिसते. केकेआरविरुद्धच्या मागील सामन्यात त्याने शानदार खेळी केली होती. हैद्राबादच्या या विध्वंसक सलामीच्या जोडीसमोर त्याच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे. तिसरा रिंगमध्ये आहे आणि दोन्ही डीप क्षेत्ररक्षक लेग-साइडवर आहेत. जागी स्लिप नाही. येथे आम्ही जातो

अन्शुल कंबोजला मिळाली पहिली विकेट, दोन वेळा विकेट घेतली. परंतु, पहिल्यांदा नो-बॉल त्यानंतर सोडलेला झेल, परंतु, त्यानंतर त्याने मयंक अगरवालला क्लिन बॉल्ड करीत तंबूचा रस्ता दाखवला.

आज अन्शुल कंबोजची दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. आज प्ले अॉफमध्ये मुंबईने दमदार गोलंदाजी करीत कमीत कमी रन्स देत हैद्राबादला जखडून ठेवले. अन्शुल कंबोजच्या एका चेंडूवर तर ट्रॅविस हेड क्लिन बोल्ड झाला परंतु, दुर्दैव असे की, तो नो-बॉल होता. त्यामुळे मुंबईला 1 विकेट मिळण्यात अपयश आले.

OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.