IPL 2024 MI vs RCB Live | प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या 17 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 धावा, पाहा लाईव्ह अपडेट | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट1 month ago

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या 17 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 154 धावा, पाहा लाईव्ह अपडेट

ऑटो अपडेट
द्वारा- Yuvraj Bhagat
21:33 PMApr 11, 2024

दिनेश कार्तिकने धमाकेदार फलंदाजी करीत 23 चेंडूत 53 धावा केल्या. दिनेश कार्तिकमुळे आरसीबीची धावसंख्या 196 धावांपर्यंत पोहचली. आरसीबीच्या धावसंख्ये मागे कर्णधार फाफ डु प्लेसिस, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक यांची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. दिनेश कार्तिकने खालच्या फळीत येऊन दमदार बॅटींग करीत मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.+
21:26 PMApr 11, 2024

आरसीबीच्या 8 विेकेट गेल्या आहेत. दिनेश कार्तिकने फाफ डु प्लेसिसनंतर संघाचा धावफलक हलता ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. 19 ओव्हरपर्यंत आरसीबीच्या 175 धावा झाल्या आहेत.

IPL 2024 MI vs RCB Live Updates : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूची सुरुवात थोडी निराशाजनक झाली.

विराट कोहलीची लवकर विकेट गेल्याने आरसीबी बॅकफूटवर

आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची 3 धावांवर विकेट गेल्याने आरसीबीची सुरुवात डळमळीतच झाली. त्यानंतर लगेच विल जॅक्स गेल्याने ताबडतोब तंबूत परतला. परंतु, फाफ डु प्लेसिस आणि रजत पाटीदार याने संघाला सन्मानजनक स्कोअर करण्यात मोठी मदत केली. दोघांनी संयमी खेळी करीत मोठी भागीदारी गेली. रजत पाटीदारने तडफदार बॅटींग करीत 26 चेंडूवर 50 धावा कुटल्या त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 37 चेंडूत 59 धावांवर अजून खेळत आहे. त्याला दिनेश कार्तिक याने चांगली साथ दिल्याने आरसीबीची धावसंख्या 15 ओव्हरमध्ये 144 धावंपर्यंत पोहचली आहे.

कर्णधार फाफ डु प्लेसिसची विकेट

कर्णधार फाफ डु प्लेसिस हासुद्धा एक मोठा फटका मारताना 61 धावा करून तंबूत परतला. बुमराहच्या चेंडूवर जोरदार फटका मारताना टीम डेव्हीडद्वारे तो झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेल श्रेयस गोपालच्या चेंडूवर पायचीत होऊन पॅव्हेलिनमध्ये परतला त्यामुळे आरसीबीचा स्कोअर पुन्हा मागे पडला.

OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.