IPL 2024 Orange Cap: A tough fight from Rohit to Virat for the Orange Cap, so many runs needed

  IPL 2024 Orange Cap, Highest Run Scorer : काल झालेल्या सामन्यात रोहित शर्माने पंजाब विरुद्धच्या 36 धावांच्या खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. आता विराट कोहलीनंतर ही ऑरेंज कॅप रोहितच्या डोक्यावर असणार आहे.

  पंजाब किग्सवर 9 धावांनी मात

  हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात पंजाब किग्सवर 9 धावांनी मात केली. पंजाबसमोर मुंबईने विजयासाठी 193 धावांचे आव्हान ठेवले होते. पंजाबला हे आव्हान झेपावले नाही. मुंबईने पंजाबचा बाजार 19.1 ओव्हरमध्ये गुंडाळला. पंजाबकडून शशांक सिंह याने 41 आणि आशुतोष शर्मा याने 61 धावांची झुंज दिली. मात्र दुसऱ्या बाजूने या दोघांना कुणालाच साथ देता आली नाही. पंजाबचा हा पाचवा पराभव ठरला.

  त्याआधी मुंबईकडून सूर्यकुमार यादव याने 78 धावा केल्या. तर रोहित शर्मा याने 25 बॉलमध्ये 2 चौकार आणि 3 सिक्ससह 36 धावांची खेळी केली.

  रोहित शर्माचा पंजाब विरुद्धचा हा आयपीएल कारकीर्दीतील 250 वा सामना होता. रोहितने या सामन्यात आयपीएलमध्ये एकूण 6 हजार 500 धावांचा टप्पा पार केला. तसेच, रोहित मुंबईकडून सर्वाधिक सिक्स ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत किरॉन पोलार्डचा रेकॉर्ड ब्रेक केला. रोहितने यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. रोहितने 36 धावांच्या मदतीने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रोहितला आता ऑरेंज कॅपसाठी आणखी एका मजबूत खेळीची गरज आहे.

  विराट कोहली ऑरेंज कॅपचा मानकरी
  ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराटने 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे. रियानने 7 सामन्यांत 318 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर 7 मॅचेसमध्ये 297 रन्स झाल्या आहेत. चौथ्या स्थानी केकेआरचा सुनील नरेन आहे. नरेनने 6 सामन्यांत 276 धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन आहे. संजूने 7 सामन्यांत 276 धावा केल्या आहेत.

  पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

   

  मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हीड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल आणि जसप्रीत बुमराह.