IPL 2024 MI vs PBKS Live | मुंबई इंडियन्सच्या 11 ओव्हरमध्ये 2 विकेटवर 99 धावा; नाणेफेक जिंकून पंजाबने गोलंदाजीचा निर्णय; पाहा प्रत्येक क्षणाची अपडेट | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट1 month ago

मुंबई इंडियन्सच्या 11 ओव्हरमध्ये 2 विकेटवर 99 धावा; नाणेफेक जिंकून पंजाबने गोलंदाजीचा निर्णय; पाहा प्रत्येक क्षणाची अपडेट

ऑटो अपडेट
द्वारा- Yuvraj Bhagat
21:28 PMApr 18, 2024

मुंबई इंडियन्सकडून सूर्याने आज धमाकेदार खेळी करीत 53 चेंडूत 78 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या 10 धावांवर बाद झाला. टिम डेव्हीडने 7 चेंडूत 14 धावा केल्या. दुसऱ्या बाजूने तिलक वर्माने बाजू सांभाळली. तिलक वर्माने संयमी खेळी करीत 18 चेंडूत 34 धावा करीत मुंबईच्या धावसंख्येत भर टाकली. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 192 धावा केल्या.

IPL MI vs PBKS Live : आज आयपीएल हंगामातील 33 व्या सामन्यात पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात कडवी झुंज होणार आहे. कारण काल झालेल्या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. त्यामुळे तळातील 3 संघ बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या तीन संघामध्ये मुंबई, पंजाब आणि बंगळुरूचा समावेश आहे. त्यामुळे दोघेही कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. मुंबईने 11 ओव्हरमध्ये 99 धावा केल्या आहेत. यामध्ये सलामीवीर इशान किशनची विकेट गेली आहे.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा एक मोठा शाॅट मारताना झेलबाद झाला. बॅटला कट लागून सॅम करनच्या चेंडूवर एक सोपा झेल ब्रारद्वारे तो आऊट झाला. त्यामुळे मुंबईच्या 2 विकेट गेल्या आहेत.

पंजाब किंग्ज : रिली रोसोव, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (क), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह

OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.