IPL 2024 MI vs RR Live | मुंबई इंडियन्सला लागोपाठ दोन धक्के; सलामी जोडी रोहित शर्मा, इशान किशन तंबूत; पाहा प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट1 month ago

मुंबई इंडियन्सला लागोपाठ दोन धक्के; सलामी जोडी रोहित शर्मा, इशान किशन तंबूत; पाहा प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट

ऑटो अपडेट
द्वारा- Yuvraj Bhagat
21:16 PMApr 22, 2024

नेहाल वढेरानंतर कर्णधार हार्दिक पांड्या लगेच बाद झाला. त्यानंतर लगेच गॅरज गोट्े लवकर बाद झाला. एकामागोमाग विकेट जात चालल्या आहेत. मुंबईचा 177 धावांवर 9 विकेट गेल्या आहेत.
20:56 PMApr 22, 2024

नेहाल वढेरा आणि तिलकने दमदार खेळी करीत 99 धावांची भागीदारी केली. जर या दोघांची चांगली बागीदारी मुंबई इंडियन्ससाठी मोलाची ठरली.
20:54 PMApr 22, 2024

सलामी जोडी लवकर गेल्यानंतर सूर्यासुद्धा बाद झाला. त्यानंतर आलेला मोहम्मद नबीसुद्धा लवकर बाद झाला. परंतु, त्यानंतर आलेला नेहाल वढेराने दमदार खेळी करीत मुंबई इंडिन्सचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. मुंबईच्या 16 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 151 धावा झाल्या आहेत. नेहाल वढेरा 49 धावांवर असताना ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर बाद झाला.
19:59 PMApr 22, 2024

सूर्या आऊट झाल्यानंतर मोहम्मद नबी खेळायला आला आहे. मानसिंह स्टेडियमवर पिच स्लो असल्यामुळे फलंदाजांना खेळायला थोडी अडचण येत असल्याचे समोर आले आहे. मुंबईची अवस्था दयनीय झाली आहे.

IPL 2024 MI vs RR Live : जयपूरच्या मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात आज मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईला पहिला धक्का बसला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 6 धावा करून तंबूत परतला आहे. त्यानंतर लगेच इशान किशन संदीप शर्माच्या चेंडूवर संजू सॅमसनद्वारे झेलबाद झाला.

मुंबई राजस्थानला हरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे. कारण मुंबई इंडियन्सने जर हा सामना जिंकला तर मुंबईचा समावेश पहिल्या चारमध्ये समाविष्ट होईल. सलामी जोडी आऊट झाल्यानंतर आता सूर्या आणि तिलक वर्मावर जबाबदारी असणार आहे.

 

OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.