RCB च्या पहिल्या विजयानंतर विराटच्या नावावर नवीन रेकॉर्ड; ‘मिस्टर IPL’चा मोठा विक्रम अन् रचला इतिहास!

  Virat Kohli Most Catches in T20 Format Indian Player : आयपीएल 2024 च्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जचे संघ आमने-सामने होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. यावेळी आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आणि मिस्टर आयपीएलला मागे टाकले आहे.

  या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने जॉनी बेअरस्टोच्या रूपाने पहिली विकेट गमावली. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर तो आऊट झाला, पण विराट कोहलीने त्याचा कॅच घेतला. विराट कोहलीचा हा टी-20 क्रिकेटमधला 173वा झेल आहे.

  यासह, तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. सुरेश रैनाने आपल्या टी-20 कारकिर्दीत 172 झेल घेतले. तर रोहित शर्मा 169 झेलांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

  टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय

  173 झेल – विराट कोहली
  172 झेल – सुरेश रैना
  167 झेल – रोहित शर्मा
  146 झेल – मनीष पांडे
  136 झेल – सूर्यकुमार यादव

  विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 108 झेल घेतले आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये एकूण 109 झेल घेतले.

  अशा परिस्थितीत विराट कोहलीने आणखी 2 झेल घेतल्यास तो आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडूही बनेल. या यादीत सुरेश रैना आणि विराटनंतर किरॉन पोलार्डचे नाव येते. किरॉन पोलार्डने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 103 झेल घेतले आहेत.