आयपीएल पुन्हा सुरू, मुंबई इंडियन्स आणि चेन्नईचा सामना किती वाजता सुरु होणार : जाणून घ्या सविस्तर

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील या आयपीएलमधी हा ३०वा सामना असेल. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता होता आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्व चाहत्यांना स्टार स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहे.

    दुबई : कोरोना महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL-2021) चा प्रवास 2 मे रोजी थांबला. आता ही स्पर्धा 140 दिवसांच्या ब्रेकनंतर यूएईमध्ये पूर्ण होईल. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापासून सुरुवात होणार आहे.

    हा सामना किती वाजता सुरु होणार?

    मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील या आयपीएलमधी हा ३०वा सामना असेल. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता होता आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सर्व चाहत्यांना स्टार स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहे.

    मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हा या सत्रातील दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सवर चार विकेट्स राखून दमदार विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात पराभवाचा बदला घेण्यासाठी चेन्नईचा संघ उत्सुक असेल. त्याचबरोबर दुसरीकडे मुंबईचा संघ दोन्ही सामने जिंकत चेन्नईच्या संघाला मोठा धक्का देणार का, याची उत्सुकताही सर्वांना असेल. मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज झालेला आहे. पण दुसरीकडे चेन्नईच्या संघाला पहिल्या सामन्यापूर्वीच काही धक्के बसले आहेत. कारण चेन्नईचा सॅम करन हा पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर चेन्नईचा ड्वेन ब्राव्हो हा दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये त्याने गोलंदाजी केलेली नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यातही ब्राव्हो गोलंदाजी करण्याची शक्यता फारच कमी आहे.

    त्यामुळे चेन्नईला पहिल्या सामन्यासाठी आपल्या संघात काही बदल करावे लागणार आहे. चेन्नईची फलंदाजी पूर्णपण सेट असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली हे चेन्नईच्या डावाची सुरुवात करतील. त्याचबरोबर सुरेश रैना आणि अंबाती रायुडू हे मध्यला फळीत असतील. त्याचबरोबर रवींद्र जडेजा, कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ब्राव्हो यांची फलंदाजी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.