आज फिफा विश्वचषकात इंग्लंड समोर इराणचे आव्हान

विश्वचषक स्पर्धेचा विचार करता इंग्लंड १६ व्या वेळेस स्पर्धेत सहभागी होत आहेत. तर इरण संघ जा ६ व्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. दोघेही पहिल्यांदाच मैदानात एकमेंकाविरुद्ध भिडणार असल्याने सामना पाहणं हे फुटबॉल प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

    २० नोव्हेंबर पासून फिफा विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाचा सामना इराण संघाशी होणार आहे.इंग्लंड संघाचा फॉर्म पाहता इराणला आज विजयासाठी अतिशय उत्तम खेळ दाखवावा लागणार असून यासामन्यात इंग्लंड संघाचं पारडं अधिक जड मानलं जात आहे. विश्वचषक स्पर्धेचा विचार करता इंग्लंड १६ व्या वेळेस स्पर्धेत सहभागी होत आहेत. तर इरण संघ जा ६ व्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. दोघेही पहिल्यांदाच मैदानात एकमेंकाविरुद्ध भिडणार असल्याने सामना पाहणं हे फुटबॉल प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.

    इंग्लंड संघाचा विचार करता सर्वांच लक्ष त्यांचा कर्णधार हॅरी केनवर असेल. त्याने पात्रता फेरीच्या सामन्यात तब्बल १२ गोल मारले आहेत. याशिवाय युवा फिल फोडेन यानेही बरेच असिस्ट केले आहेत. तर स्टर्लिंगवरही सर्वांच्या नजरा असतील. इराण संघात मेहदी तरेमी याने ५ गोल पात्रता फेरीत केल्याने तो त्यांचा महत्त्वाचा खेळाडू असेल. तर अली घोलीजादेह, होसेन कनान यांच्याकडूनही संघाला बऱ्याच अपेक्षा आहेत.

    येथे पहा सामना :
    आजचा हा इंग्लंड विरुद्ध इराण सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ :३० मिनिटांनी सुरु होणर आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक २०२२ चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-१८ आणि स्पोर्ट्स-१८ एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.