इटलीची ऑस्ट्रियावर मात, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक ; २-१ने केला पराभव

इटलीने या सामन्यात ऑस्ट्रियाचा २-१ने पराभव केला. हा संघाचा सलग १२ वा विजय होता. इटलीकडून फ्रेडरिक चियासाने ९५ व्या मिनिटाला अतिरिक्त वेळेत आणि पेसिनाने १०५ व्या मिनिटाला गोल केला. त्याच वेळी ११४ व्या मिनिटाला ऑस्ट्रियाकडून कलाजीचने गोल करत पुनरागमन केले.

    यूरो कप २०२०च्या उपांत्यपूर्व फेरीत इटली आणि डेन्मार्कने स्थान मिळवले आहे. डेन्मार्कने ४-० असा विजय मिळवला तर अतिरिक्त वेळेत झालेल्या रोमांचकारी सामन्यात इटलीने ऑस्ट्रियाचा २-१ ने पराभव केला. ऑस्ट्रियाने पहिल्यांदा युरो चषकाच्या बाद सामन्यांमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर सलग बाराव्या सामन्यात इटलीच्या संघाने विजय मिळवला आहे.

    इटलीने या सामन्यात ऑस्ट्रियाचा २-१ने पराभव केला. हा संघाचा सलग १२ वा विजय होता. इटलीकडून फ्रेडरिक चियासाने ९५ व्या मिनिटाला अतिरिक्त वेळेत आणि पेसिनाने १०५ व्या मिनिटाला गोल केला. त्याच वेळी ११४ व्या मिनिटाला ऑस्ट्रियाकडून कलाजीचने गोल करत पुनरागमन केले. मात्र, त्यानंतर दोन्हीकडून एकही गोल होऊ शकला नाही आणि अशा प्रकारे ऑस्ट्रियन संघ हरला.

    इटलीच्या संघाने मागील १८ युरो कप सामन्यांपैकी केवळ २ सामने गमावले आहेत. इटलीचा संघ मागील ३१ सामन्यांत अजिंक्य राहिला आहे. यावेळी संघाने २५ सामने जिंकले असून ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.