चेन्नई सुपर किंग्जचा जबरदस्त झटका! जडेजा ‘आयपीएल’बाहेर

चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे ‘आयपीएल’च्या उर्वरित हंगामाला मुकावे लागणार आहे. जडेजा चेन्नईच्या उर्वरित सामन्यांत खेळू शकणार नाही. बरगड्यांच्या दुखापतीमुळे त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दिली(Jadeja out of IPL ).

  मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापतीमुळे ‘आयपीएल’च्या उर्वरित हंगामाला मुकावे लागणार आहे. जडेजा चेन्नईच्या उर्वरित सामन्यांत खेळू शकणार नाही. बरगड्यांच्या दुखापतीमुळे त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दिली(Jadeja out of IPL ).

  जडेजासाठी यंदाचा हंगाम विसरण्याजोगा ठरला. त्याला हंगामाच्या सुरुवातीला चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, चेन्नईने आठपैकी केवळ दोन सामने जिंकल्याने त्याने कर्णधारपद सोडले. तसेच जडेजाची वैयक्तिक कामगिरीही निराशाजनक ठरली. त्याने 10 सामन्यांत 116 धावा केल्या आणि केवळ पाच बळी मिळवले.

  सीएसकेसोबत वाद उघड

  आयपीएलमध्ये रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वाद झाल्याच्या बातमीनंतर रवींद्र जडेजाने आयपीएलमधून अधिकृतपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर रवींद्र जडेजाला अनफॉलो केले आहे.

  जडेजा गेल्या 10 वर्षांपासून फ्रँचायझीचा महत्त्वाचा भाग आहे. आयपीएलसाठी संघाचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याला संघात घेतले आहे. फ्रँचायझीने त्याला तब्बल 16 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले होते.

  पृथ्वी शॉही आयपीएल बाहेर

  दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पृथ्वी शॉची प्रकृती अजूनही बरी नसून त्याला तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पृथ्वी शॉने त्याच्या सोशल मीडियावर एक अपडेट देत याबाबत माहिती दिली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही उपस्थित नसल्याने चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.