ऑस्ट्रेलिया संघाला दणका, जाडेजाचा अचूक झेल टीम इंडियासाठी ठरला मोलाचा योगदान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टचं पहिलं सत्र भारताच्या नावावर राहिलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने तीन धक्के दिले. जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. जो बर्न्स शून्य रनवर आऊट झाला, यानंतर पुढच्या दोन्ही विकेट आर.अश्विनने घेतल्या. पण अश्विनच्या यातल्या एका विकेटमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने मोलाचं योगदान दिलं.

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आजपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टचं पहिलं सत्र भारताच्या नावावर राहिलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने तीन धक्के दिले. जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. जो बर्न्स शून्य रनवर आऊट झाला, यानंतर पुढच्या दोन्ही विकेट आर.अश्विनने घेतल्या. पण अश्विनच्या यातल्या एका विकेटमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने मोलाचं योगदान दिलं.

अश्विनने ऑस्ट्रेलियाचा दुसरा ओपनर मॅथ्यू वेड (Mathew Wade) याला 30 रनवर माघारी धाडलं. मॅथ्यू वेड याने अश्विनने टाकलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने हवेत खेळला. हा कॅच पकडण्यासाठी रविंद्र जडेजा आणि शुभमन गिल दोघंही धावले. एका क्षणी या दोघांची टक्कर होईल, असं वाटत होतं, पण जडेजाने बॉलवर कब्जा करत मॅथ्यू वेडला माघारी धाडलं.

या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमने चार बदल केले आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. तर पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा यांना डच्चू देण्यात आला.