जयस्वाल व बटलरच्या अर्धशतकी खेळीने राजस्थान रॉयल्सचे दिल्ली कॅपिटल्ससमोर 199 धावांचा डोंगर

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा 11 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला.

    मुंबई : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेचा 11 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला. गुवाहाटीच्या क्रिकेट मैदानावर हा सामना होत आहे. जयस्वाल आणि बटलर यांनी राजस्थान रॉयल्सला चांगली सुरुवात करुन दिली आहे. राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 200 धावांचा आव्हान दिले आहे.

    जयस्वालने अर्धशतक पूर्ण केले. केवळ 25 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याला बटलरची चांगली साथ लाभली. जयस्वालने 11 चौकार ठोकत चांगली कामगिरी केली. राजस्थान रॉयल्सने 199 धावा करत दिल्ली कॅपिटल्सला 200 धावांचा आव्हान दिले आहे. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थान संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर क्रीझवर उतरले होते. यावेळी दिल्लीकडून खलील अहमद पहिले षटक टाकत होता.