रोमांचक सामन्यात जपानचा जर्मनीवर २-१ ने विजय

सामन्याचा विचार करता सामना सुरु होण्यापूर्वी जर्मनीचा यंदाचा स्कॉड पाहता ते सहज सामना जिंकतील असं वाटत होतं. त्यांनी सुरुवातीपासून चांगली पकड बनवली होती. सामन्यात तब्बल ७४ टक्के पजेशन जर्मनीकडे होतं. तर २६ टक्के पजेशनच्या जोरावर जपाननं दोन गोल करत सामनाही जिंकला.

    फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत रोमांचक सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. अर्जेंटिनाचा सौदी अरेबियाकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतर बुधवारी तशाच प्रकारे जपान विरुद्ध जर्मनी यांच्यातील सामन्यात जपानने जर्मनीवर रोमहर्षक विजय मिळवला आहे. फीफा रँकिंगमध्ये ११ व्या स्थानी असणाऱ्या जर्मनीला २४ व्या स्थानावरील जपान संघाने धुळचारात सामना २-१ ने जिंकला आहे. त्यामुळे फुटबॉल विश्वात आता मोठे उलटफेर होताना दिसू लागले आहेत.

    सामन्याचा विचार करता सामना सुरु होण्यापूर्वी जर्मनीचा यंदाचा स्कॉड पाहता ते सहज सामना जिंकतील असं वाटत होतं. त्यांनी सुरुवातीपासून चांगली पकड बनवली होती. सामन्यात तब्बल ७४ टक्के पजेशन जर्मनीकडे होतं. तर २६ टक्के पजेशनच्या जोरावर जपाननं दोन गोल करत सामनाही जिंकला. जर्मनीकडून इल्के गुंडोगन यानं ३३ व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीनं पहिला गोल केला.

    हाल्फ टाईमपर्यंत दोन्ही संघानी एकही गोल केला नाही. हाल्फ टाईमनंतरही दोन्ही संघाकडून प्रयत्न होत होते पण ते गोलमध्ये बदलत नव्हते. ७४ मिनिटं झाली तरी १-० स्कोर असल्याने जर्मनी जिंकणार असंच वाटत होतं. पण ७५ व्या मिनिटाला खेळाडूंनी जपानसाठी पहिला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. ज्यानंतर मात्र जपाननं जोरदार आक्रमणं सुरु केली आणि ८३ व्या मिनिटाला जपानच्या टाकुमी मिनामिनो याने गोल करत जपानला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर ९० मिनिटं होऊन अतिरिक्त वेळेतही जर्मनी गोल करु शकली नाही आणि त्यामुळे हा सामना जपानने २-१ ने जिंकला.