जपानच्या शिस्तीचे FIFA ने देखील केले कौतुक; ‘हा’ फोटो केला ट्विट

मोठा सामना जिंकल्यावर जपानच्या संघातील खेळाडू आपल्या खोलीमध्ये गेले आणि अस्ताव्यस्त पसरलेले सामान योग्य मांडणीत ठेवले. याबद्दल जागतिक फुटबॉल संघटनेने जपानच्या खेळाडूंचे आभार मानत स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे ट्विट केले.

    जपान (Japan) हा देश अतिशय शिस्तप्रिय आहे. जपानच्या याच शिस्तप्रियत्याचे दर्शन कतार मध्ये होत असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतही पहायला मिळाले आहे. बुधवारी जर्मनी विरुद्ध जपान या दोन संघांमध्ये फुटबॉल सामान खेळवण्यात आला होता. यावेळी चार वेळा फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जिंकलेल्या जर्मनीच्या संघाचा जपान संघाने २-१ ने पराभव केला. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीलाच एवढा मोठा विजय मिळाल्यावर हुरळून न जाता जपानी संघाने शिस्तीचे पालन करून खेळाडूंनी आपल्या खोलीची स्वच्छता करून सगळ्यांसमोरच आदर्श ठेवला आहे. यानंतर फिफाने सामन्यानंतरच्या जपानच्या खोलीचा फोटो ट्विट करत जपानी भाषेतच त्यांचे (डोमो आरिगातो/ धन्यवाद) आभार मानले आहेत.

    मोठा सामना जिंकल्यावर जपानच्या संघातील खेळाडू आपल्या खोलीमध्ये गेले आणि अस्ताव्यस्त पसरलेले सामान योग्य मांडणीत ठेवले. याबद्दल जागतिक फुटबॉल संघटनेने  जपानच्या खेळाडूंचे आभार मानत स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे ट्विट केले.

    खलिफा मैदानावर झालेल्या जर्मनीविरुद्धच्या सामन्यानंतर जपानच्या फुटबॉल चाहत्यांनी सुद्धा प्रेक्षागृहातील स्वच्छता केली होती. त्यांचाच आदर्श घेऊन खेळाडूंनीपण आपल्या खोलीतील स्वच्छता केली आहे. जपानच्या या स्वच्छता मोहिमेबद्दल जगभरातील फुटबॉलप्रेमींकडून त्यांचे कौतुक होत आहे.