जसप्रीत बुमराहने चहलकडून हिसकावून घेतली पर्पल कॅप, शर्यतीत हे महान गोलंदाज

सध्या या स्पर्धेमध्ये गोलंदाज दमदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.

    आयपीएल 2024 : आयपीएल 2024 चा हा हंगाम रंगतदार झाला आहे. आयपीएल 2024 मध्ये दररोज एकापेक्षा जास्त सामने पाहायला मिळत आहेत. गुणतालिकेची स्थिती सुद्धा मजेशीर आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे, तर आरसीबी संघाची सध्याच्या हंगामात स्थिती खराब आहे. 7 सामने खेळल्यानंतर आरसीबी संघाला केवळ एकच विजय मिळाला आहे. याशिवाय ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची शर्यतही रोमांचक होत आहे.

    सध्या या स्पर्धेमध्ये गोलंदाज दमदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. अलीकडेच मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पर्पल कॅप पटकावली आहे. त्याने चहलकडून पर्पल कॅप हिसकावून घेतली आहे. मुल्लानपूरमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात जसप्रीत बुमराहची कामगिरी अतिशय उत्कृष्ट होती. बुमराहने सामन्यात 4 षटकात 21 धावा देत 3 बळी घेतले. सामन्यानंतर त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. यासह बुमराहने युझवेंद्र चहलचा पराभव करत पर्पल कॅप जिंकली.

    जसप्रीत बुमराहने गुरुवारी मोहाली येथे पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 4 षटकात 21 धावा देत 3 बळी घेतले. यासह त्याने युझवेंद्र चहलला मागे टाकून यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे, तर चहल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बुमराहने आतापर्यंत 7 सामने खेळले असून या कालावधीत त्याने एकूण 13 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 21/5 अशी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चहलचे नाव आहे, ज्याने 7 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी आहे, ज्याने 7 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत. खलील अहमद 10 विकेट्ससह चौथ्या आणि कागिसो रबाडा 10 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.