भालाफेकपटू नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीला धोनीच्या टीमकडून सलाम, बक्षिसासह करणार खास सन्मान

१२१ वर्षांच्या इतिहासात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज चोप्रा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच गोल्ड मेडल मिळवण्यानंतर नीरजने हे सुवर्ण पदक ‘फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे दिवगंत धावपटू मिल्खा सिंह यांना समर्पित केलं आहे. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्द महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आयपीएल टीम असलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) त्याचा खास सन्मान करण्याचं ठरवलं आहे.

  टोक्यो ऑलिम्पिकसाठी कालचा दिवस इतिहास ठरला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने लांब भाला फेकत सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरजने अंतिम फेरीत आपलं वर्चस्व कायम ठेवत पहिल्याच थ्रोमध्ये ८६.०३ मीटर इतका दूर भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८७.५८ मीटर इतका दूर भाला फेकत इतिहास रचला आहे.

  १२१ वर्षांच्या इतिहासात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारा नीरज चोप्रा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच गोल्ड मेडल मिळवण्यानंतर नीरजने हे सुवर्ण पदक ‘फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे दिवगंत धावपटू मिल्खा सिंह यांना समर्पित केलं आहे. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्द महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) आयपीएल टीम असलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) त्याचा खास सन्मान करण्याचं ठरवलं आहे.

  सीएसकेच्या टीमकडून नीरज चोप्राला १ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. टोक्यो ऑलिम्पिकमधील त्याच्या खेळानं लाखो भारतीयांना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे ते आता खेळातील या सर्वोच्च स्टेजवर सर्वोच्च शिखर गाठण्याचा प्रयत्न करतील.

  नीरजचा सन्मान करण्यासाीठी ८७५८ नंबरची विशेष जर्सी देखील त्यासा सीएसकेकडून देण्यात येणार आहे.' अशी माहिती सीएसकेच्या प्रवक्त्यानं दिली आहे.

  विजयानंतर नीरजने दिली अशी प्रतिक्रिया…

  नीरजने सांगितलं की, मी माझे हे सुवर्ण पदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता,असं नीरज याने सांगितले.