भारतासाठी शनिवारचा दिवस ठरला ऐतिहासिक, सुवर्ण जिंकणाऱ्या नीरज चोप्राची कहाणी!

नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील आहे. आपलं वजन कमी करण्यासाठी त्याने अॅथलेटिक्समध्ये सहभाग घेतला होता.  नीरजने चंदीगडमधून शिक्षण घेतलं. भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. तरी जिद्दीच्या जोरावर त्याने या खेळात सातत्य ठेवलं आणि चांगली कामगिरी करत राहिला.

    भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम मोडला आहे. भारतासाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. कारण भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. नीरजने अंतिम फेरीत आपलं वर्चस्व कायम ठेवत पहिल्याच थ्रोमध्ये ८६.०३ मीटर इतका दूर भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८७.५८ मीटर इतका दूर भाला फेकत सुवर्ण कामगिरी केली आहे.

    नीरजची पार्श्वभूमी काय ?

    नीरजचा जन्म २४ डिसेंबर १९९७ रोजी हरयाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खंड्रा गावात एका छोट्या शेतकऱ्याच्या घरी झाला. आपलं वजन कमी करण्यासाठी त्याने अॅथलेटिक्समध्ये सहभाग घेतला होता. नीरजने चंदीगडमधून शिक्षण घेतलं.

    भालाफेक या खेळाची कोणतीही पार्श्वभूमी त्याच्या गावात नव्हती. तरी जिद्दीच्या जोरावर त्याने या खेळात सातत्य ठेवलं आणि चांगली कामगिरी करत राहिला. पोलंडमध्ये २०१६ च्या IAAF जागतिक २० वर्षांखालील चॅम्पियनशिपमध्ये नीरजने ८६.४८ मीटर भाला फेकून सुवर्ण जिंकलं.