भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात झुलनने रचला नवा रेकॉर्ड

    मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यात एक दिवसीय मालिकेला काल रविवार पासून सुरुवात झाली. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ विकेट्सने धुव्वा उडवत पहिला सामना जिंकला. भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ही तिच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका खेळात आहे. मात्र या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात तिने एक विक्रम केला असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    झुलन गोस्वामी (Zhulan Goswami) इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. झूलनने २००२ पासून २०२२ पर्यंत तब्बल २०१ वन डे सामने खेळले आहेत. पण आजच्या सामन्यात तिने एक खास रेकॉर्ड नावे केला आहे. झुलनने या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर कॅथरीन फिट्जपॅट्रिकचं रेकॉर्ड तोडलं आहे. इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांत विकेट्सचा रेकॉर्ड झुलननं तोडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीनच्या नावावर २३ विकेट्स असून झुलनं सामन्यातील आपली पहिली विकेट घेत २४ विकेट्स पूर्ण करत नवा विक्रम रचला आहे.