जोस बटलर सुद्धा आहे माहीचा फॅन, व्हिडिओ व्हायरल

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    जोस बटलर : एमएस धोनीचे (MS Dhoni) चाहते हे भारतातच नाही तर जगभरातमध्ये आहेत. त्याचबरोबर अनेक बॉलीवूड कलाकार सुद्धा महेंद्रसिंह धोनीचे चाहते आहेत. महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. या खेळाडूची क्रेझ चाहत्यांच्या डोक्यावरून जाते. महेंद्रसिंह धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता इंग्लंडचा फलंदाज आणि आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या जोस बटलर (Jos Buttler) सुद्धा महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांच्या रांगेत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये जोस बटलर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या क्रेझबद्दल बोलत आहे.

    जोस बटलरचा व्हिडिओ व्हायरल

    नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने जोस बटलरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जोस बटलर म्हणाला की, महेंद्रसिंग धोनीची फॅन फॉलोइंग कमालीची आहे. या खेळाडूविरुद्ध खेळणे ही सन्मानाची बाब आहे. माहीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. मात्र, जोस बटलरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

    राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा आजचा सामना

    आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. आज पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. आजचा हा चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर होणार आहे त्यामुळे धोनीचे आणि चेन्नईचे चाहते त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि माहीला पाहण्यासाठी नक्कीच गर्दी करतील. सध्या चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत. तर, राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचे 11 सामन्यांत 16 गुण आहेत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्जला राजस्थान रॉयल्सचा पराभव करून प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत करायचा आहे.