jose butler

जोस बटलरचे संपूर्ण कुटुंब आता भारतात पोहोचले आहे. जोस बटलर बराच काळ आपल्या कुटुंबापासून दूर होता. या व्हिडिओमध्ये जॉस बटलर आपली मुलगी जॉर्जियाला हॉटेलच्या लॉबीमध्ये मिठी मारत आहे.

    Jose Butler : राजस्थान रॉयल्सचा (आरआर) खेळाडू जोस बटलरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये जोस बटलर अनेक महिन्यांनंतर आपल्या कुटुंबाला भेटत आहे. जोस बटलरचे संपूर्ण कुटुंब आता भारतात पोहोचले आहे. जोस बटलर बराच काळ आपल्या कुटुंबापासून दूर होता. या व्हिडिओमध्ये जॉस बटलरने आपली मुलगी जॉर्जियाला हॉटेलच्या लॉबीमध्ये मिठी मारली आहे. त्यावेळी तिची आईही जॉर्जियासोबत होती. त्यानंतर बटलरने पत्नीला मिठी मारली. राजस्थान रॉयल्सने (RR) हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत.

    याशिवाय इंग्लंडच्या वार्म आर्मीनेही ट्विट करून हा व्हिडिओ शेअर केला आहे. जोस बटलर हा आयपीएल 2022 च्या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. वास्तविक, जोस बटलर आयपीएल सुरू होण्यापूर्वीच भारतात आला होता. गेल्या 2 महिन्यांपासून तो राजस्थान रॉयल्स (RR) संघासोबत आहे. यामुळे तो कुटुंबापासून दूर होता. राजस्थान रॉयल्स (RR) शिबिरात आल्यानंतर बटलरची मुलगी जॉर्जिया सर्वांची आवडती बनली आहे. ती संघातील खेळाडूंसोबत अगदी आरामात राहून वातावरणाचा आनंद घेत आहे.