kajol sargar

काजोलने (Kajol Sargar) खेलो इंडिया (Khelo India) स्पर्धेत ४० किलोखालील वजनी गटात महाराष्ट्राला सुवर्ण पदक (Gold Medal For Maharashtra) मिळवून दिले.

    मुंबई: खेलो इंडिया (Khelo India) स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजोल सरगरने सुवर्णपदक पटकावलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काजोलचे वडील महादेव सरगर सांगलीत पानपट्टी चालवतात. काजोलने (Kajol Sargar) ४० किलोखालील वजनी गटात महाराष्ट्राला सुवर्ण पदक (Gold Medal For Maharashtra) मिळवून दिले. खेलो इंडियानंतर काजोलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच काजोलने आता ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.

    काजोल सरगर (Kajol Sargar) चे वडील महादेव सरगर एक पानटपरी चालवतात. आई छोटेसे हॉटेल चालवते.  सांगलीतील दिग्विजय इन्स्टिट्यूटमध्ये काजोल कोच मयूर सिंहासने यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. एका गरीब कुटुंबातून कष्टाने वर येऊन स्वत:च कौशल्य सिद्ध करणाऱ्या काजोलचं सर्वत्र कौतुक होत आहे.

    मोठ्या जिद्दीने तिने प्रशिक्षण घेत हरियाणा येथे ५ जून रोजी पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत ४० किलो वजनी गटात सहभाग घेतला. या वजनी गटात १३ खेळाडू स्पर्धक सहभागी होते. या सर्वांना मागे टाकत काजोलने ३ लिफ्ट क्लिअर करत सुवर्णपदक पटकावले. काजोलच्या कष्टामुळे आज महाराष्ट्राला वेट लिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळालं आहे.