Kevin O'Brien says goodbye to cricket; Retired from ODI cricket

आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केव्हिन ओब्रायनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वनडे क्रिकेटला अलविदा केल्याचे 37 वर्षीय ओब्रायनने सांगितले.

    दुबई : आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केव्हिन ओब्रायनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वनडे क्रिकेटला अलविदा केल्याचे 37 वर्षीय ओब्रायनने सांगितले.

    आंतरराष्ट्रीय सामन्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये आयर्लंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ओब्रायनचा तिसरा क्रमांक लागतो. त्याने 153 सामन्यात 3619 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीतही त्याने चमकदार कामगिरी केली असून संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत त्याच्या नावे 68 सामन्यात 114 बळींची नोंद आहे.

    आयर्लंडकडून 15 वर्षे खेळल्यानंतर मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. 153 वेळा माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे. या आठवणी आयुष्यभर टिकून राहतील. हा सोपा निर्णय नव्हता, परंतु खूप विचार केल्यावर मला असे जाणवले, की मी पूर्वीच्या तुलनेत वनडे संघात योगदान देऊ शकत नाही. एकदिवसीय सामन्याबद्दलची भूक आणि प्रेम यापुढे पूर्वीसारखे राहिलेले नाही, असे ओब्रायनने म्हटले आहे.

    भारतात आयोजित 2011च्या वनडे वर्ल्डकपदरम्यान केव्हिन ओब्रायन प्रकाशझोतात आला होता. त्याने इंग्लंडविरुद्ध 63 चेंडूत 113 धावांची वादळी खेळी साकारली होती. यात 6 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता. अवघ्या 50 चेंडूत त्याने शतक ठोकले होते आणि वर्ल्डकपमधील हे वेगवान शतक ठरले होते. इंग्लंडच्या 328 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने सुरुवातीला आपले फलंदाज गमावले, तेव्हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ओब्रायनने सुरेख खेळी करत संघाला जिंकवले. आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासातील हा सर्वात मोठा विजय होता.