अरबी समुद्रात ३६ किलोमीटर पोहून कीर्तीचा जागतिक विक्रम

जागतिक विक्रम करण्यासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कीर्तीने सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावात दररोज आठ तास सराव केला होता. तर गेल्या दीड महिन्यापासून मुंबई येथील समुद्रात सुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे.

    मुंबई : सोलापूरच्या १६ वर्षीय जलतरणपटूने अरबी समुद्रात सुमारे ३६ किलोमीटर पोहून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. कीर्ती नंदकिशोर भराडिया असे या जलतरणपटूचे नाव असून तिने अरबी समुद्रात लगातार ६ तास पोहत ३८ किलोमीटरचे अंतर पार केलं आहे.

    कीर्तीने गुरुवारी हा विक्रम केला असून सकाळी १२ वाजता मुंबईतील वरळी सी लिंक येथून तिने पोहायला सुरुवात केली होती. तर सायंकाळी ७:२२ वाजता गेट वे आॅफ इंडियापर्यंत आली. हा जागतिक विक्रम करण्यासाठी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कीर्तीने सोलापुरातील मार्कंडेय जलतरण तलावात दररोज आठ तास सराव केला होता. तर गेल्या दीड महिन्यापासून मुंबई येथील समुद्रात सुद्धा तिने पोहण्याचा सराव केला आहे.