किवी संघाचा सलग दुसरा विजय; दुसऱ्या सामन्यात नेदलँडचा 99 धावांनी पराभव, गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?

नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हा निर्णय काही अंशी चुकीचा ठरवला आणि धावांचा डोंगर रचला. न्यूझीलंडकडून विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल आणि टॉम लॅथम यांनी जबरदस्त खेळी करत धावांचा तीनेशच्या पार टप्पा केला.

    हैदराबाद : विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या सहाव्या सामान्यात न्यूझीलंडने संघाने नेदरलँडला (Netherland vs New Zealand Live) मोठ्या धावसंख्येन पराभूत केले आहे. किवी संघाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हा एकदा 300 पार धावा केल्या. न्यूझीलंडने 50 षटकात 7 गडी गमावून 322 धावा केल्या आणि विजयसाठी 323 धावांचं आव्हान दिलं आहे. नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हा निर्णय काही अंशी चुकीचा ठरवला आणि धावांचा डोंगर रचला. न्यूझीलंडकडून विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल आणि टॉम लॅथम यांनी जबरदस्त खेळी करत धावांचा तीनेशच्या पार टप्पा केला.

    नेदलँडचा सलग दुसरा पराभव…

    दरम्यान, न्यूझीलंडने नेदरलँडचा 99 धावांनी पराभूत केलं. यासह न्यूझीलंडने एकूण 4 गुणांची कमाई करत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. तर नेदरलँडचा स्पर्धेतील प्रवास आणखी खडतर झाला आहे. नेदरलँड या स्पर्धेत सलग दुसरा पराभव आहे. त्यामुळं त्यांच्यासमोरील आव्हान आणखी कठीण झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 गडी गमवून 322 धावा केल्या आणि नेदरलँडसमोर विजयासाठी 323 धावांचं आव्हान ठेवलं. पण नेदरलँडचा संघ 223 धावा करू शकला.

    गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?

    न्यूझीलंड आणि नेदरलँडचा पराभव करत चार गुणांसह किवी संघ पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंड संघाचा नेटरनरेटही +1.958 इतका झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन गुण आणि +2.040  नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या संघाचे रनरेट +1.620 इतका आहे. बांगलादेशचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा नेट रनरेट  +1.438 इतका आहे. भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. भारतीय संघाचा रनरेट +0.883 इतका आहे.