जानेवारीच्या ‘या’ तारखेला होणार KL राहुल आणि अथिया शेट्टीचं लग्न

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर राहुलने बीसीसीआयकडे 'मिनी ब्रेक' मागितल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. आता त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या समोर येत असून हे दोघे जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

    भारताचा स्टार क्रिकेटपटू के एल राहुल (K L Rahul) आणि अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty)  हे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून समोर येत आहे. टी २० विश्वचषकापूर्वी अथिया शेट्टीचे वडील म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी याने के एल राहुल त्याच्या व्यस्त शेड्युल मधून मोकळा झाला की अथिया आणि राहुल लग्न करणार असल्याचे सांगितले होते .

    विश्वचषकानंतर केएल राहुलला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून त्याला त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे विश्रांती देण्यात आली होती. आता त्यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या समोर येत असून हे दोघे जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

    टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुल घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर राहुलने बीसीसीआयकडे ‘मिनी ब्रेक’ मागितल्याचे एका वृत्तात म्हटले आहे.

    InsideSport च्या रिपोर्टनुसार, KL राहुल जानेवारी-2023 च्या पहिल्या आठवड्यात अथिया शेट्टी सोबत लग्न करणार आहे. सूत्रांच्या माहिती नुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अथिया आणि KL राहुल या दोघांचा विवाह होणार असून हा विवाह एक डेस्टिनेशन वेडिंग असणार असल्याचे देखील बोलले जात आहे.