जाणून घ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या ८ व्या दिवसाचे संपूर्ण शेड्युल

  बर्मिंगहममध्ये येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022)सातव्या दिवसाअंती भारताची पदक संख्या वाढतच चालली आहे. सातव्या दिवशी मुरली श्रीशंकरने लांब उडी प्रकारात रौप्य पदक पटकावले तर सुधीरने देखील पॅरा पॉवरलिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदकाची कामे केली. या दोन्ही खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारताची पदक संख्या आता २० वर येऊन पोहोचली आहे.

  राष्ट्रकुल स्पर्धेच्या ७ व्या दिवशी भारत सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात कांस्य पदकासह ७ व्या स्थानी आहे. भारतीय बॉक्सर्सनी विविध श्रेणींच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून तब्बल सात पदक निश्चित केलेली आहेत. शुक्रवारी स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारत कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, स्क्वाश, लॉन बॉल्समध्ये आपली दावेदारी सादर करणार आहे. कुस्तीतील सहा प्रकारात भारतीय खेळाडू पदकासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत.

   

  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ८व्या दिवशी भारताचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :

  अँथलेटिक्स आणि पॅरा अँथलेटिक्स

  महिलांची १०० मीटर अडथळा फेरी १, हीट २ : ज्योती याराजी – दुपारी ३:०६
  महिलांची लांब उडी पात्रता फेरी – अ गट: अँसी एडापिली – दुपारी ४:१०
  पुरुषांची ४x४०० मीटर रिले फेरी १, हीट २: सायंकाळी ४:१९
  पुरुषांची तिहेरी उडी पात्रता अ

  बॅडमिंटन (भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल)

  महिला दुहेरीची १६ फेरी: जॉली ट्रीसा/पुलेला गायत्री गोपीचंद वि लेउंग/गणेश – दुपारी ४:१०
  पुरुष एकेरी फेरी १६: के श्रीकांत विरुद्ध डुमिंडू अबेविक्रमा – संध्याकाळी ५:३०
  महिला एकेरी फेरी १६: पीव्ही सिंधू विरुद्ध हुसीना कोबुगाबे – संध्याकाळी ६:१०
  महिला एकेरी फेरी १६: अक्षरी कश्यप विरुद्ध इवा कट्टीर्झी – रात्री ११:२०
  पुरुष एकेरीची १६ फेरी: लक्ष्य सेन विरुद्ध यिंग झियांग लिन – रात्री ११:२०

  पॅरा टेबल टेनिस

  महिला एकेरी, वर्ग ३-५, उपांत्य फेरी: भावना पटेल वि स्यू बेली – दुपारी २:४०
  महिला एकेरी, वर्ग ३-५, उपांत्य फेरी: सोनल पटेल वि क्रिस्टीना इकेपोये – दुपारी २:४०
  पुरुष एकेरी, वर्ग ३-५, उपांत्य फेरी: राज अरविंदन वि नस्लरू सुळे – दुपारी २:४०