‘या’ कारणामुळे कोहलीनंही नाकारली होती ‘पेप्सी’ची कोट्यवधींची ऑफर ; सहा वर्षांचा करार संपुष्टात, विराटने सांगितलं असं काही…

ज्या गोष्टी मी स्वत: खात, पीत नाही, त्या मी दुसऱ्यांना कसं काय खाण्यास सांगू शकतो, असं ठाम मत व्यक्त करत कोहलीनं 'पेप्सी' कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला होता. फक्त पैसे कमावण्यासाठी मी लोकांना काहीही खाणं किंवा पिण्यास कसं सांगू? असा सवाल मनात उपस्थित झाला होता त्यामुळे पेप्सी कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचं कोहली म्हणाला होता.

    पोर्तुगाल संघाच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोनाल्डोनं टेबलवर ठेवलेली ‘कोकाकोला’ कंपनीच्या बाटल्या उचलून बाजूला ठेवल्या होत्या आणि पाण्याची बाटली दाखवून त्याचं समर्थन केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियात एकच धुमाकूळ उडाला. रोनाल्डोनं सॉफ्ट ड्रिंक्स विरोधात उचलेलं हे पाऊल जगभरात चर्चेचा विषय बनला.

    परंतु फक्त रोनाल्डोच नव्हे, तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानंही काही वर्षांपूर्वी असंच एक पाऊल उचललं होतं. २०१७ साली भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं ‘पेप्सी’ कंपनीसोबतचा सहा वर्षांचा करार संपुष्टात आणला होता आणि कोट्यवधींची ऑफरवर पाणी सोडलं होतं.

    विराटने सांगितलं असं काही…

    ज्या गोष्टी मी स्वत: खात, पीत नाही, त्या मी दुसऱ्यांना कसं काय खाण्यास सांगू शकतो, असं ठाम मत व्यक्त करत कोहलीनं ‘पेप्सी’ कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला होता. फक्त पैसे कमावण्यासाठी मी लोकांना काहीही खाणं किंवा पिण्यास कसं सांगू? असा सवाल मनात उपस्थित झाला होता त्यामुळे पेप्सी कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचं कोहली म्हणाला होता.