आज भिडणार कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा सामना?

सध्या गुणतालिकेमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

  दिल्ली विरुद्ध कोलकाता: सध्या आयपीएल 2024 चा दुसरा टप्पा सुरु आहे आणि यावेळी गुणतालिकेची स्थिती पाहता अत्यंत मजेशीर आहे. प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना महत्वाचा आहे. आज कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडणार आहेत. आजच्या सामन्यांमध्ये कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. सध्या गुणतालिकेमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे.

  दिल्ली कॅपिटल्सने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. स्कोअर बोर्डवर 261 धावा करूनही केकेआरला शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला. कोलकात्याने या मोसमात पहिल्याच चकमकीत दिल्लीला खराब चिरडले होते, त्यामुळे पंतच्या सेनेला त्या पराभवाचा स्कोअर ईडन गार्डन्सच्या मैदानावर सोडवायचा आहे. सध्या दोन्ही संघांकडे 10 गुण आहेत. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्याच हेतूने मैदानात उतरतील.

  IPL 2024 मध्ये KKR विरुद्ध DC सामना कधी होणार?
  कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2024 चा 47 वा सामना 29 एप्रिल रोजी होणार आहे.

  IPL 2024 चा 47 वा सामना कुठे खेळला जाईल?
  कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (KKR vs DC) यांच्यातील IPL 2024 चा 47 वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल.

  केकेआर विरुद्ध डीसी सामना किती वाजता सुरू होईल?
  आयपीएल 2024 चा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. टॉस अर्धा तास आधी होईल.

  KKR vs DC सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहायचे?
  तुम्ही स्टार स्पोर्ट्स चॅनलवर टीव्हीवर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा थेट सामना पाहू शकता. जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.