कोलकाता नाईट रायडर्सने केला सनरायझर्स हैदराबादचा ५४ धावांनी पराभव

प्रत्युत्तरात एसआरएच संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १२३ धावा करता आल्या. अभिषेक शर्माने सर्वाधिक ४३ धावा केल्या. रसेलनेही 3 विकेट्स घेत बॉलसह आपली ताकद दाखवली.

    मुंबई – आयपीएल २०२२ च्या करा किंवा मराच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ५४ धावांनी पराभव करून प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकांत ६ गडी गमावून १७७ धावा केल्या. आंद्रे रसेलने २८ चेंडूत ४९ धावा केल्या. सॅम बिलिंग्सने ३४ धावा केल्या.

    प्रत्युत्तरात एसआरएच संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १२३ धावा करता आल्या. अभिषेक शर्माने सर्वाधिक ४३ धावा केल्या. रसेलनेही 3 विकेट्स घेत बॉलसह आपली ताकद दाखवली.

    या निकालासह KKR चे १३ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना शेवटचा सामना जिंकावा लागेल आणि इतर साखळी सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने जावेत यासाठी प्रार्थना करावी लागेल. दुसरीकडे SRH संघ या पराभवानंतरही शर्यतीत आहे. त्याचे १२ सामन्यांत १० गुण आहेत. SRH ला देखील शेवटचे दोन सामने जिंकणे आवश्यक आहे आणि उर्वरित सामन्यांचे निकाल त्यांच्या बाजूने येणे आवश्यक आहे.