kolkata knight riders

नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आणखी एक संघ विकत घेतला आहे. नाइट रायडर्स ग्रुपने यूएई टी२० लीग अबु धाबी फ्रेंचायजी खरेदी केली आहे. सहा संघाच्या लीगमध्ये नाइट रायडर्स ग्रुपच्या संघाचे नाव नाम अबु धाबी नाइट राइडर्स असे आहे. नाइट रायडर्स ग्रुपचा हा चौथा संघ आहे.

    अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan)  कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) ग्रुपने मोठी उलाढाल केली आहे. नाइट रायडर्सने आणखी एक संघ विकत घेतला आहे. नाइट रायडर्स ग्रुपने यूएई टी२० लीग अबु धाबी फ्रेंचायजी खरेदी केली आहे. सहा संघाच्या लीगमध्ये नाइट रायडर्स ग्रुपच्या संघाचे नाव नाम अबु धाबी नाइट राइडर्स असे आहे. नाइट रायडर्स ग्रुपचा हा चौथा संघ आहे.

    याआधी आयपीएलमध्ये (IPL) कोलकाता नाइट रायडर्स आणि २०१५ मध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये (CPL) ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाची खरेदी केली होती. त्याशिवाय मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) स्पर्धेतही हा ग्रुप लॉस एंजलिस फ्रेंचायजीची स्थापना करणार आहे. नाइट राइडर्स ग्रुपची मालकी हक्क बॉलीवुड स्टार शाहरुख खान, अभिनेत्री जूही चावला आणि जय मेहता यांच्याकडे आहे.

    शाहरुख खान याविषयी म्हणाला की, गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर आम्ही नाइट रायडर्स ग्रुपचा विस्तार करत आहोत. युएईमध्ये टी २० क्रिकेटला जवळून पाहात आहोत. आम्ही यूएईमध्ये टी २० लीगचा भाग होण्यास उत्सुक आहोत. येथेही आम्हाला नक्कीच यश मिळेल याचा विश्वास आहे.

    यूएई टी२० लीगचे अध्यक्ष खालिद अल जारूनी म्हणाले की, टी २० क्रिकेट लीगमध्ये नाइट रायडर्स ग्रुपचे योगदान मोठं आहे. यूएईमध्ये नाइट रायडर्स ग्रुप जोडल्यामुळे आम्ही उत्साही आहोत.