मुंबईत सूर्य तळपल्याने कोलकाता नाईट रायडर्स ५ विकेटने पराभूत

आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामातील २२ वा सामना आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात सुरू आहे. मुंबई इंडियन्सने १८६ धावांचे लक्ष्य गाठताना, १० षटकांत २ विकेटवर १०० धावा केल्या आहेत.

    मुंबई : मुंबई इंडियन्स १८६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. त्यांच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात करून दिली. आजचा दिवस इशांत किशनचा होता त्याने धमाकेदार फलंदाजी करीत २५ चेंडूत ५९ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने कोलकातावर शानदार ५ विकेटने विजय मिळवला.

    MI vs KKR Live :

    आज आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध केकेआरचा थरार सुरू आहे. मुंबईला घरच्या मैदानावर सामना असल्याने नक्कीच फायदा मिळणार आहे. परंतु, या पिचचा ते किती फायदा घेतात हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे. आजच्या सामन्यात विलक्षण बदल पाहायला मिळाले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा नाही. त्याच्याऐवजी सूर्याकडे मुंबईची धुरा असणार आहे. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरला आज संधी देण्यात आली आहे.

    केकेआरची प्रथम फलंदाजी : केकेआरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ विकेटवर १८५ धावा केल्या. केकेआरची सुरुवात तशी निराशाजनकच झाली. परंतु, तिसऱ्या स्थानावर आलेल्या व्यंकटेश अय्यरने तुफान फटकेबाजी करीत ५१ चेंडूत १०४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या नितेश राणा अवघ्या ५ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेले फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. आज रिंकू शर्मासुद्धा १८ धावा करून झेलबाद झाला.

    व्यंकटेश अय्यरची मोठी खेळी व्यर्थ : 

     

    केकेआरची आयपीएलमधील कामगिरी :

    मुंबई इंडियन्सने शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आपली पराभवाची मालिका खंडित केली. तर कोलकाता नाईट रायडर्सचा सनराईस हैदराबादने पराभव केला. शेवटचा सामना जिंकूनही मुंबई इंडियन्सचा संघ दडपणाखाली असेल. रोहितने मुंबईसाठी दिल्लीविरुद्ध ६५ धावा केल्या, पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. तर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म सुरुच आहे.

    कोलकाता नाईट रायडर्स :
    इशान किशन (wk), कॅमरॉन ग्रीन, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (c), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पीयूष चावला, डुआन जॅनसेन, रिले मेरेडिथ
    मुंबई इंडियन्सचा संघ :
    रहमानउल्ला गुरबाज (wk), वेंकटेश अय्यर, N जगदीसन, नितीश राणा (c), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरूण चक्रवर्ती.