आज IPL मधील दुसऱ्या सामन्यात कोलकाता विरुद्ध पंजाब भिडणार; कोण मारणार बाजी? सामन्याची वेळ माहितेय का?

दोन्ही संघांमधील मागील सामन्यांवर नजर टाकली तर गेल्या पाच सामन्यांपैकी केकेआरने तीन सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने दोन सामने गमावले आहेत. पंजाब संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असल्यानं त्यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार आहे.

मोहाली : शुक्रवारपासून जगातील क्रिकेटच्या महाउत्सवाला सुरुवात झालेय. काल जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेटमधील आयपीएल (IPL 2023) लिगला सुरुवात झाली आहे. सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सने (CSK) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांचं योगदान दिले. याला प्रतिउत्तर देताना, गुजरातने चेन्नईवर पाच गडी राखत विजय मिळवल. गुजरातने 19.2 ओव्हरमध्ये 5 बाद 182 धावा केल्या. गुजरातकडून शुबमन गिल याने सर्वाधिक 63 धावा केल्या. यानंतर आज आयपीएलमधील दुसरा सामना किंग्ज एलेव्हन पंजाब (Punjab) व कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkatta) यांच्यात होणार आहे. मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association Stadium) आयएस बिंद्रा स्टेडियमवर (IS Bindra Stadium) आज दुपारी साडे तीन वाजता पंजाब (Punjab) आणि कोलकाला (Kolkata) संघ आमनेसामने असतील.

कोण बाजी मारणार?

कोलकाता संघ आपला नियमित कर्णधार श्रेयस अय्यरशिवाय मैदानात उतरणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर सध्या संघाबाहेर आहे. सध्या केकेआरची कमान नितीश राणाच्या हाती आहे. तर पंजाबचा कर्णधार आक्रमक फलंदाज शिखर धवन आहे. दोन्ही कर्णधार नवीन आहेत. त्यामुळं कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघांमधील मागील सामन्यांवर नजर टाकली तर गेल्या पाच सामन्यांपैकी केकेआरने तीन सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्सने दोन सामने गमावले आहेत. पंजाब संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असल्यानं त्यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार आहे.

नवा गडी नवं राज्य…

दरम्यान, आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघासाठी दोन्ही कर्णधार नवीन आहेत. नवी गडी नवं राज्य. पंजाबचा संघ अनुभवी शिखर धवनच्या नेतृत्वात तर कोलकाताचा संघाची कमान नितीश राणाच्या हाती असेल. दोन्ही संघ नव्या नेतृत्वाखाली जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पंजाब किंग्सचा आयपीएलच्या एकाही सीझनमध्ये विजय मिळवता आलेला नाही. त्याउलट राजस्थान संघाने याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन वेळा आयपीएलची ट्रॉफी कमावली आहे.