आज कोलकाता करणार का प्लेऑफमध्ये एंट्री, मुंबई घेणार मागील पराभवाचा बदला

मुंबई इंडियन्सच्या संघाला मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

  केकेआर विरुद्ध मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा आज 60व्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आजचा हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे. आजच्या या सामन्यात कोलकाताच्या संघाला विजय मिळवून प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्याची संधी आहे तर मुंबई इंडियन्सच्या संघाला मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

  वाचा – https://www.navarashtra.com/sports/as-soon-as-the-helicopter-shot-dhonis-fan-in-the-field-in-the-ongoing-match-532033/

  जाणून घ्या गुणतालिकेतील दोन्ही संघांची स्थिती
  कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचे आतापर्यत 11 सामन्यांमध्ये 8 विजय मिळवले आहेत. कोलकाताचा संघ 16 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि राजस्थान रॉयल्सपेक्षा चांगला नेट रनरेट आहे. मुंबई इंडिन्सचा संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचे आतापर्यत 12 सामने झाले आहेत त्यापैकी त्यांनी फक्त ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यंदाच्या मोसमात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही.

  जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी
  कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई मुंबई यांच्यामध्ये आतापर्यंत 33 सामने झाले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्सने 23 वेळा विजय मिळवला आहे. कोलकाता फक्त 10 वेळा जिंकला आहे पण या मोसमात कोलकाता मुंबईवर जड दिसत आहे. गेल्या 12 सामन्यांत मुंबईने केवळ चारच विजय मिळवले आहेत. यंदाच्या मोसमात कोलकाताने मुंबईचा वानखेडे स्टेडियमवर 24 धावांनी पराभव केला आहे.