lakshya sen

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला हरवून सुवर्णपदकावर (Gold Medal To Lakshya Sen) आपलं नाव कोरलं आहे.

    बर्मिंगहॅम: कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला हरवून सुवर्णपदकावर (Gold Medal To Lakshya Sen) आपलं नाव कोरलं आहे. अटीतटीच्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत १९-२१, २१-९, २१-१६ च्या फरकाने सामना जिंकला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं २० वं सुवर्णपदक आहे. भारताच्या एकूण पदकांची संख्या आता ५७ झाली आहे. यामध्ये १५ रौप्यपदक आणि २२ कांस्यपदकांचा समावेश आहे.

    याआधी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं (PV Sindhu) कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध (Michelle Li) सामना जिंकून सुवर्णपदक जिंकलं. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध २१-१५, २१-१३ असा विजय मिळवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.