यानंतर दिल्ली फलंदाजीला आली तेव्हा मुरुगन अश्विन आणि बासिल थम्पीने एका षटकात २-२ बळी घेत दिल्लीला बॅकफूटवर आणले. १०० धावांवर ६ विकेट गमावलेल्या दिल्लीचा पराभव निश्चित वाटत होता, मात्र अक्षर आणि ललित यांच्यात ३० चेंडूत ७५ धावांची भागीदारी झाली आणि दिल्लीचा विजय झाला.
मुंबई – आज पहिला डबल हेडर म्हणजेच IPL मधील दोन सामने. पहिला सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. जिथे डीसीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशानच्या ८१ धावांच्या जोरावर मुंबईने १७७ धावा केल्या.
यानंतर दिल्ली फलंदाजीला आली तेव्हा मुरुगन अश्विन आणि बासिल थम्पीने एका षटकात २-२ बळी घेत दिल्लीला बॅकफूटवर आणले. १०० धावांवर ६ विकेट गमावलेल्या दिल्लीचा पराभव निश्चित वाटत होता, मात्र अक्षर आणि ललित यांच्यात ३० चेंडूत ७५ धावांची भागीदारी झाली आणि दिल्लीचा विजय झाला.
अखेरच्या षटकात दोघांनी शानदार फलंदाजी केली. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारले. ३ षटकात १० धावांचा दर आवश्यक होता, परंतु १० चेंडू शिल्लक असताना दोघांनी विजय मिळवला.