प्रशिक्षकाविना लॉन बॉल संघाची सुवर्ण यश, पुरस्काराच्या निधीतूनच करावा लागतो पुढचा दौरा

पुरस्कारातून मिळालेल्या पैशातून पुढील स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडूंना परदेशात जावे लागते. विशेष म्हणजे लॉन बॉल फेडरेशनला भारत सरकारने अद्यापही मान्यता दिलेली नाही.

    नवी दिल्ली – कॉमनवेल्थ गेम्समध्ये लॉन बॉल खेळात सुवर्णपदक जिंकून भारतीय खेळाडूंनी आश्चर्यचा धक्का दिला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ज्या महिला संघाने हा विजय खेचून आणण्याचा पराक्रम केला, त्या संघाला प्रशिक्षकच नव्हता. सदर संघ हा प्रशिक्षकाविनाच बर्मिंगहमला गेला होता. या खेळातील खेळाडूंना कोणत्याही स्पर्धेसाठी जाण्याआधी स्वतःच निधी गोळा करावा लागतो.

    पुरस्कारातून मिळालेल्या पैशातून पुढील स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडूंना परदेशात जावे लागते. विशेष म्हणजे लॉन बॉल फेडरेशनला भारत सरकारने अद्यापही मान्यता दिलेली नाही.

    लॉन बॉल जिंकणारी भारतीय संघाची खेळाडू रूपा राणी तिर्की हिने फोनवर बोलताना सांगितले की, संघ प्रशिक्षकाविनाच राष्ट्रकुल खेळायला गेलेला आहे. प्रशिक्षक नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेक वेळा खेळाडूंना मैदानावर काय करावे, रणनीती कशी आखावी, खेळात काय बदल करावे, याची माहिती नव्हती. त्यामुळे अनेकदा चुका होत असत. खेळाडू वैयक्तिक रजेवर बर्मिंगहॅमला गेले आहेत.

    बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ गेम्स खेळण्यासाठी गेलेल्या लवली चौबे आणि रूपा राणी तिर्की या खेळाडूंना राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोकरीवरून विशेष सुटी मिळाली नाही. लवली चौबे झारखंड पोलिसांत हवालदार म्हणून कार्यरत आहे. विभागाच्या वतीने रजा मंजूर करण्यात येत नव्हती. तेव्हा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटी मंजूर करण्यात आली. तर रूपा राणी तिर्की रामगडमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी आहे. रूपाने फोनवर बोलताना सांगितले की, तिला कॉमनवेल्थसाठी सुटी मिळाली नाही. आपल्या पगारात कपात तर होणार नाही ना, अशी भीती रूपाला वाटते.