
चेपॉकच्या स्टेडियमवर एक आगळा-वेगळा अनुभव क्रिकेट शौकिनांच्या नजरेत भरला. दोन महान दिग्गज एकमेकांना भेटत होते. पण, एक जेष्ठ दिग्गज दुसऱ्या तरुण दिग्गजाकडून ऑटोग्राफ घेत होता. खरोखर हा क्षण सगळ्यांनाच अचंबित करणारा होता. दरम्यान, दिग्गज सुनील गावसकर ऑटोग्राफ घेत असताना रोमांचित झाले होते, एम.एस. धोनीच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते, तो क्षण सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खरोखरच भावनिक होता.
चेन्नई : आयपीएल २०२३च्या ६१व्या सामन्यानंतर मैदानावर असे काही घडले ज्याची महेंद्रसिंग धोनीच्या कोणत्याही चाहत्याला अपेक्षा नसेल. भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर हे मैदानात धावत-धावत माहीजवळ आले पोहोचवले आणि त्याच्या शर्टवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. धोनीने महान फलंदाज लिटल मास्टर गावसकरांच्या विनंतीला मान देऊन छानशी अशी ऑटोग्राफ दिली. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने मोठे मन दाखवत गावसकरांना भर मैदानात हा ऑटोग्राफ घेतला. क्रिकेट जगतातील भारताच्या या दोन दिग्गजांचा हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्यासारखा होता. या सुंदर घटनेचा साक्षीदार झालेल्या तेथील सर्व खेळाडू आणि चाहत्यांना खूप अभिमान वाटला असेल यात कुठलीच शंका नाही.
This is unbelievable. Sunil Gavaskar was running all around to have MS autograph.
This is what DHONI has earned in his career. THE RESPECT.pic.twitter.com/E6FVNOvjZM
— 𝑻𝑯𝑨𝑳𝑨 (@Vidyadhar_R) May 14, 2023
आयपीएलमधील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक क्षण काल रात्री पाहावयास मिळाला. जेव्हा महान सुनील गावसकर एका सामान्य चाहत्याप्रमाणे ऑटोग्राफ घेण्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या मागे धावू लागले. निमित्त होते चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या १६व्या हंगामातील शेवटच्या सामन्याचे, जो १४मे रोजी म्हणजेच रविवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला गेला. धोनीच्या संघाने कदाचित सामना गमावला असेल, परंतु चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर त्यांच्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी संपूर्ण मैदानाला चक्कर मारत होता, त्यात अचानक भारताचे महान फलंदाज लिटिल मास्टर गावसकर मागून आले आणि त्यांनी धोनीकडे त्यांच्या शर्टवर ऑटोग्राफ घेतली. हे भारतीय क्रिकेटमधील दोन महान कर्णधार, महान फलंदाजांच्या भेटीचा क्षण सर्व चेन्नई वासियांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.
— Abhishek Padhan (@imabhishek12345) May 14, 2023
दोन दिग्गजांची ग्रेट-भेट
कोलकाताचा सामना संपल्यावर धोनीची एक छोटेखानी मुलाखत झाली. ही मुलाखत संपल्यावर चेन्नईच्या संघाचा पूर्ण स्टाफ त्याची वाट पाहत होता. कारण खेळाडूंनी हातात बऱ्याच भेटवस्तू घेतल्या होत्या. या भेटवस्तू माही आपल्या चाहत्यांना देणार होता. चेन्नईच्या संघातील अनेक खेळाडू धोनीच्या हातात या वस्तू देत होते आणि धोनी ते स्टेडियममधील चाहत्यांच्या दिशेने भिरकावत होता. त्यावेळी चाहते या भेटवस्तू आपल्याला मिळाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न करत होते पण ही सर्व गोष्ट सुरु असताना मैदानात धोनीला भेटायला आले ते सुनील गावसकर.
धोनीसाठी हा अभिमानाचा क्षण
आपल्या ज्येष्ठ सुनील गावसकर यांना ऑटोग्राफ देणे हा धोनीसाठी अभिमानाचा क्षण असावा. अशा परिस्थितीत जेव्हा धोनीने लिटिल मास्टरच्या शर्टवर ऑटोग्राफ द्यायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण स्टेडियम जल्लोष करू लागला. कॉमेंट्री करणारे गावसकर सामना संपल्यानंतर पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी पोहोचले तेव्हा काही मिनिटांपूर्वी टीव्हीवर जगासमोर घडलेल्या या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करायला ते विसरले नाहीत.
पोस्ट मॅच शो दरम्यान सुनील गावसकर यांनी कॅमेरामनला शर्ट झूम करण्यास सांगितले कारण त्यांना माहीचा ऑटोग्राफ दाखवायचा होता. गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले, धोनीवर कोण प्रेम करत नाही? गेल्या काही वर्षांत त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे केले ते खूप अलौकिक आहे. मुख्य म्हणजे तो एक तरुण खेळाडूंचा आदर्श राहिला आहे. त्यामुळे अनेक तरुण त्याच्याकडे बघून शिकत आहेत. तो संपूर्ण टीमसोबत मैदानावर फेरफटका मारणार हे ऐकताच मी कोणाकडून तरी पेन उसना घेतला आणि शांतपणे माझ्याकडे ठेवला. गावसकर भेटायला आल्याचे कळताच धोनीही थोडा थांबला. त्याने आपल्या चाहत्यांना भेटवसू देणे थोडा वेळ थांबवले. त्यानंतर एम.एस. आणि सुनील गावसकर यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली. हे सर्व झाल्यावर धोनीने थेट आपला हात त्यांच्या शर्टच्या जवळ नेला. त्याने गावसकरांना त्यांच्या शर्टवर आपली ऑटोग्राफ दिली आणि त्या दोघांमध्ये स्मितहास्य पाहायला मिळाले. ऑटोग्राफ मिळाल्यावर गावसकर यांनी धोनीला मिठी मारली आणि त्यानंतर त्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या.