पदक हरले ; पण मने जिंकली  गोल्फर अदिती अशोकला चौथ्या स्थानावर मानावे लागले समाधान

गोल्फर अदितीला स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. एकूण ४ दिवसात झालेल्या ४ फेऱ्यांमध्ये पहिल्या ३ फेऱ्यात आदिती दुसऱ्या स्थानावर होती.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये(Tokyo Olympic)  भारतीय गोल्फर अदितीला (Golfer Aditi Ashok) अवघ्या १ स्ट्रोकने ऑलिम्पिकमधील पदक गमावावे लागले आहे. गोल्फर अदितीला स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. एकूण ४ दिवसात झालेल्या ४ फेऱ्यांमध्ये पहिल्या ३ फेऱ्यात आदिती दुसऱ्या स्थानावर होती.

    मात्र आजच्या चौथ्या दिवसाच्या अंतिम फेरीत सुरुवातीला ३ आणि नंतर ती चौथ्या स्थानावर घसरली. चौथ्या फेरीमध्ये जपानची इनामी मोनी प्रथम आली आणि अमेरिकेची नेली कोर्डा द्वितीय तर न्यूझीलंडच्या लिडिया कोने तिसऱ्या स्थानावर पोहचली .

    आदितीच्या शानदार खेळीनंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. यामध्ये ते म्हणाले

    ”आदिती अशोक छान खेळलेस , भारताच्या आणखी एका कन्येने ऑलिम्पिकमध्ये आपली छाप उमटवली. आज तुम्ही आपलया ऐतिहासिक कामगिरीने भारतीय गोल्फला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आले. अफाट शांत आणि संयमाने खेळत आपलया धैर्य आणि कौशल्याचा प्रभावी प्रदर्शनाबद्दल अभिनंदन !! असे कौतुक त्यांनी केले आहे. ”