LSG owners snap up KL Rahul after Lucknow's crushing loss; Video Viral; Veteran players expressed their displeasure

LSG Owners Snap KL Rahul Video : आयपीएलचा हंगामातील 57 वा सामना काल खेळला गेला. लखनऊच्या पराभवानंतरचा कॅप्टन केएल राहुल आणि संघमालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  LSG Owners Snap up KL Rahul : सनरायजर्स हैदराबादने बुधवारी लखनौ सुपर जायंट्सचा दारुण पराभव केला. लखनौनं दिलेले 166 धावांचे आव्हान हैदराबादने अवघ्या 58 चेंडूत पार केले. लखनौच्या दारुण पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोयंका यांनी केएल राहुलची शाळा घेतली. केएल राहुल आणि गोयंका यांचा सामन्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये गोयंका लखनौचा कर्णधार केएल राहुल याच्यासोबत चर्चा करताना दिसत आहे.

  व्हिडीओतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट

  दारुण पराभवानंतर गोयंका केएल राहुल याच्यावर ओरडून बोलत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. पण केएल राहुल त्यांना शांततेत उत्तर देत असल्याचे व्हिडीओत दिसतेय. याप्रकारानंतर संजीव गोयंकाच्या नेटवर्थबद्दल चर्चा सुरु झाली. मालकाने ढवळढवळ करणं योग्य आहे का? केएल राहुलने लखनौला रामराम ठोकावा… असेही नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

  आरपीएसजी कंपनीचे चेअरमन आहेत गोयंका

  लखनौ सुपर जांयट्सचे मालक संजीव गोयंका यांच्याबद्दल तुम्हाला माहिती देमार आहोत. त्यांची कमाई किती याबाबतही सांगणार आहोत. संजीव गोयंका यांचा जन्म कोलकात्यामध्ये झाला. तिथेच त्यांचं शिक्षणही झालं. त्यांनी सेंट जेवियर्स कॉलेजमधून बी.कॉमचं शिक्षण घेतलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार संजीव गोयंका यांची नेटवर्थ 3.4 बिलियन डॉलर इतकी आहे. यंदाच्या फोर्ब्स मासिकाच्या यादीत ते 949 व्या क्रमांकावर होते. संजीव गोयंका आरपीएसजी कंपनीचे चेअरमन आहेत.

  संजीव गोयंकाची कंपनी कोणत्या क्षेत्रात करते व्यवसाय

  आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स या संघाशिवाय संजीव गोयंका मोहन बागान या प्रसिद्ध फुटबॉल संघाचे मालक आहेत. संजीव गोयंका यांच्या आरपीएसजी कंपनीमध्ये 50 हजार पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. आरपीएसजी कंपनी भारताशिवाय जगभरात व्यवसाय करते. कॉर्बन ब्लॅक, पॉवर, आयटी, रिटेल प्रोडक्ट्स, मीडिया एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, शिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये व्यवसाय करत आहे. त्यासोबत संजीव गोयंका आयआयटी खरगपूर येथे बोर्ड मेंबर म्हणूनही कार्यकरत आहेत.

  लखनऊचे संघमालक केएल राहुलवर संतापले?
  ट्रेविस हेड (Travis Head) आणि अभिषेक शर्माच्या (Abhisehk Sharma) वादळात लखनौ सुपर जाएंटसच्या गोलंदाजीची धूळदाण उडाली. हैदराबादने 10 विकेट आणि 62 बॉल राखून विजय मिळवला. लखनौचा हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. लखनौच्या पराभवानंतरचा कॅप्टन केएल राहुल आणि संघमालक संजीव गोएंका (Sanjiv Goenka) यांच्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लखनौ सुपर जाएंटसचे संघमालक संजीव गोएंका देखील या पराभवानंतर संतापलेले दिसून आले. संजीव गोएंका यांनी ऑन कॅमेरा केएल राहुलला सुनावलं असल्याचं व्हिडीओवरुन दिसून येतं. संजीव गोएंका नेमकं काय म्हणत होते ते जरी समजलं नसलं तरी व्हिडीओमधून नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज लावता येतो.