
प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने एलएसजीला २११ धावांचे लक्ष्य दिले आहे. सीएसकेकडून रॉबिन उथप्पा (५०), शिवम दुबे (४९) आणि रायडू (२७) यांनी चांगली फलंदाजी केली. लखनौच्या आवेश खान, रवी बिश्नोई आणि अँड्र्यू टाय यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
मुंबई – IPL चा सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने एलएसजीला २११ धावांचे लक्ष्य दिले आहे. सीएसकेकडून रॉबिन उथप्पा (५०), शिवम दुबे (४९) आणि रायडू (२७) यांनी चांगली फलंदाजी केली. लखनौच्या आवेश खान, रवी बिश्नोई आणि अँड्र्यू टाय यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. प्रत्युत्तरात लखनौने 5 षटकांत एकही विकेट न गमावता 51 धावा केल्या.
धोनीने सात हजार धावा पूर्ण केल्या
धोनीने या सामन्यात 6 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या. आपल्या डावातील 15वी धावा करण्यासोबतच त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये 7,000 धावाही पूर्ण केल्या. या फॉरमॅटमध्ये 7000 धावा करणारा धोनी भारताकडून सहावा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली (10326), रोहित शर्मा (9936), शिखर धवन (8818), रॉबिन उथप्पा (7120) यांची नावे येतात. तसेच, आयपीएलच्या इतिहासात प्रथमच धोनीने षटकार लगावत खाते उघडले.