
आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 6 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून (Won the Toss) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील 6 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून (Won the Toss) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ प्रदीर्घ काळानंतर त्यांच्या होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहे. जिथे त्यांनी आतापर्यंतचा मोठा विक्रम केला आहे.
महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर 1426 दिवसानंतर खेळणार आहेत. चेपॉकवर खेळलेल्या 60 पैकी 41 सामन्यांत CSK ने विजय मिळवले आहेत आणि धोनीने येथे 48 डावांत 43.97 च्या सरासरीने 1363 धावा केल्या आहेत. ज्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नईने येथे RR विरुद्ध 4 बाद 246 ही सर्वोत्तम धावसंख्या उभी केली होती. सुरेश रैनाने चेपॉकवर सर्वाधिक 1498 धावा केल्या आहेत आणि यंदा प्रथमच त्याच्याशिवाय CSK येथे खेळणार आहे. 3 वर्ष, 10 महिने, 3 आठवडे आणि 4 दिवसांनी धोनीला चेपॉकवर खेळताना पाहण्यासाठी स्टेडियमही खचाखच भरले आहे.
चेन्नईची आयपीएल 2023 मधील सुरुवात काही खास झाली नाही आणि पहिल्याच सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली. ऋतुराज गायकवाड वगळता CSKच्या अन्य फलंदाजांना प्रभाव पाडता आलेला नव्हता. गोलंदाजीतही माहीचे डावपेच चुकले. त्यामुळे आता घरच्या मैदानावर विजयी सुरूवात करण्यासाठी CSK सज्ज आहे. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सने पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 50 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे CSK समोर तडगे आव्हान असेल हे निश्चित आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली CSK ने चेपॉकवर 56 पैकी 40 सामने जिंकले आहेत.