शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊचा बंगळूरूवर चित्तथरारक विजय; स्टॉयनिस-पूरनची वादळी खेळी

शेवटचा चेंडू दिनेश कार्तिकच्या हातामध्ये गेला. हा चेंडू व्यवस्थित पकडून जर कार्तिकने फेकला असता तक एकही धाव होऊ शकली नसती. पण कार्तिकला यावेळी हा चेंडू नीट पकडताच आला नाही आणि त्याच्या हातून चेंडूबरोबर सामनाही निसटला. अंतिम चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊ संघाने थरारक असा विजय मिळवला.

    बंगळुरु– इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या मोसमात काल (रविवारी) आयपीएलमधील सर्वात मोठा चित्तथरारक सामना झाला. लखनऊ जायंन्टस (LSG) आणि बंगळुरु (RCB) यांच्यात अतिशय रोमहर्षक व शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊने एक गडी राखत बंगळुरुवर विजय मिळवला. सामन्यामध्ये अनेकवेळा पारडं आरसीबीच्या बाजूने तर काही वेळा पारडं हे लखनऊ संघाच्या बाजूने झुकलं. मात्र अंतिम चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊ संघाने थरारक असा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने २ बाद २१२ धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसच्या सलामीच्या भागीदारीमुळे ग्लेन मॅक्सवेल आणि कंपनीला मोठ्या धावसंख्येसाठी एक उत्तम लॉन्च पॅड मिळाला. (Lucknow Super Kings vs Royal Challengers Bangalore)

    आरसीबीचा धावांचा डोंगर…

    दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली व मैक्सवेलच्या अर्धशतकी खेळीमुळं आरसीबीला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. तर तर काही गोलंदाज अधिक महागडे. मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २२ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय वेन पारनेलने 4 षटकांत ४१ धावा देत ३ बळी घेतले. दुसरीकडे कर्ण शर्माने ३ षटकांत ४८ धावा देत २ बळी घेतले. उर्वरित गोलंदाजांमध्ये हर्षल पटेलने ४ षटकांत ४८ धावा देत १ बळी घेतला. आरसीबीच्या संघाने विराट कोहली, फॅफ ड्यु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २१२ धावांचा डोंगर उभारला होता.

    स्टॉइनिस आणि पूरनची वादळी खेळी…

    २१३ धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवातीला खराब फलंदाजी पाहायला मिळाली. संघाने पहिल्याच षटकात १ धावांवर काइल मेयर्सच्या (०) रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला दीपक हुडाही फार काळ टिकू शकला नाही आणि १० चेंडूत ९ धावा काढून तो वेन पारनेलचा बळी ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने काही काळ जबाबदारी सांभाळली आणि ३० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. पुरणने केवळ १९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ३२६.३२ होता. पूरन आणि आयुष बडोनी यांनी मिळून सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. अखेरच्या चेंडूवर लखनौला एकच धाव हवी होती. शेवटचा चेंडू दिनेश कार्तिकच्या हातामध्ये गेला. हा चेंडू व्यवस्थित पकडून जर कार्तिकने फेकला असता तक एकही धाव होऊ शकली नसती. पण कार्तिकला यावेळी हा चेंडू नीट पकडताच आला नाही आणि त्याच्या हातून चेंडूबरोबर सामनाही निसटला. अंतिम चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात लखनऊ संघाने थरारक असा विजय मिळवला.