आज लखनौ आणि दिल्ली आमनेसामने, जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी

आतापर्यत या आयपीएल 2024 च्या सीझनमध्ये दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघांना स्पर्धेत पुढे जाण्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

    आयपीएल 2024 (IPL 2024) चा हा सिझन मनोरंजक होत चालला आहे. कालचा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. आज आयपीएल 2024 च्या 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. आजचा हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. आतापर्यत या आयपीएल 2024 च्या सीझनमध्ये दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघांना स्पर्धेत पुढे जाण्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

    लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 च्या या हंगामामध्ये 4 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स 5 पैकी फक्त 1 सामना जिंकून गुणतालिकेमध्ये तळाच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत आज दोन्ही संघांना जिंकायचे आहे, पण त्याआधी या दोघांमध्ये आतापर्यंत कोणाचा वरचष्मा राहिला आहे ते जाणून घेऊया.

    जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी
    आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात तीन सामने झाले आहेत. लखनौने तिन्ही सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे. म्हणजेच लखनौची दिल्लीविरुद्धच्या विजयाची टक्केवारी 100 इतकी आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात लखनौचा संघ एकदाच दिल्लीवर वर्चस्व गाजवू शकतो. मात्र, या सामन्यातून दिल्लीचा संघ लखनौविरुद्ध पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल.