मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने, बंगळुरूचा मुंबईवर ‘विराट’ विजय; डु प्लेसिस-कोहलीची दमदार अर्धशतके

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांनी भ्रमनिराश केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव लवकर माघारी परतले. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली.

बंगळुरु: आयपीएलमध्ये (IPL 2023) रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरुनं (RCB) मुंबईला (Mumbai) 8 गडी राखून आरामात विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील सुपर संडेचा दुसरा सामना अतिशय रोमहर्षक ठरला. तिलकच्या खेळीच्या जोरावर मुंबईने उभारलेले 172 धावांचे आव्हान बंगळुरूने 16.2 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. सलामीवीर कर्णधार विराट कोहली व फाफ डु प्लेसिसच्या स्फोटक फलंदाजीच्या बळावर आरसीबीने चांगली सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. अखेर  8 गडी राखत बंगळुरुनं मुंबईवर सहज व सोपा विजय मिळवला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 2013 पासून ते आतापर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत  प्रत्येक मोसमातील आपला सुरुवातीचा  सामना जिंकता आलेला नाही.

मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने…

मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेतील गेल्या 10 वर्षातील परंपरा या वर्षातही कायम ठेवली आहे. मुंबईचा आयपीएलच्या 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 8 विकेट्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या पराभवासह मुंबई इंडियन्सचं 2013  पासून प्रत्येक मोसमातील आपला पहिला सलामीचा सामना जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. मुंबईची पराभवाने सुरुवात झाल्याने मुंबईच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

आरसीबीचा सहज विजय…

आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांनी भ्रमनिराश केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव लवकर माघारी परतले. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने दमदार अर्धशतकांच्या जोरावर सहज विजय मिळवला. या दोघांनीही दमदार अर्धशतके ठोकली.