
पुणे : गोव्यात नाेव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या कबड्डीचे पुरुष आणि महिला संघ जाहीर झाले आहे. अनुक्रमे किरण मगर, हरजित कौर संधू यांच्याकडे नेतृत्व साेपविण्यात आले आहे.
गोवा येथील मल्टी-पर्पज इनडोअर स्टेडियम येथे दि. ४ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत “३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार अाहे. कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी दोन्ही संघ जाहीर केले. किरण मगर यांच्याकडे पुरूष संघाची तर हरजित कौर संधू हिच्याकडे महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली.
यांच्याकडे असणार उपकर्णधार पदाची जबाबदारी
आदित्य शिंदे , पौर्णिमा जेधे यांच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी साेपविली अाहे. पुरुषांचा संघ दादा आव्हाड तर महिलांचा संघ राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलात सराव करीत आहे.
दोन्ही उपविजेते ठरले
या विषयी चांदेरे म्हणाले, ‘‘गत राष्ट्रात क्रीडा स्पर्धेत आपले दोन्ही उपविजेते ठरले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य कबड्डी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अाजी माजी खेळाडू,संघटक यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. त्यांनी संघटनेला आर्थिक सक्षम केले अाहे. सध्या राज्याच्या पुरुष व महिला खेळाडू मध्ये खेळाचा दर्जा सुधारलेला आहे.
३६ व्या नॅशनल गेम्समध्ये
गुजरात येथे झालेल्या ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये पुरुष व महिला संघाने द्वितीय क्रमांक मिळविला होता. त्यावेळी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी या दोन्ही संघाचा, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांचा सन्मान करण्यात आला होता. त्याच वेळेस पवार यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या ३७ व्या नॅशनल गेम्स गोवा येथे संपन्न होणार आहे.
या खेळाडूंनी अजिंक्यपद मिळवावे
महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खेळाडूंनी अजिंक्यपद मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.त्याअनुषंगाने यावर्षीच्या ३७ व्या नॅशनल गेम्ससाठी निवडण्यात आलेला हा संघ उत्कृष्ट असून गतवर्षी हुकलेले सुवर्ण पदक यंदा मिळविण्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत’’ असा विश्वास चांदेरे यांनी व्यक्त केला.
निवडण्यात अालेले संघ पुढील प्रमाणे :
पुरुष संघ :- १)किरण मगर(संघनायक), २)आदित्य शिंदे(उपसंघनायक), ३)राम अडागळे, ४)मयूर कदम, ५) असलम इनामदार, ६)आकाश शिंदे, ७)शेखर तटकरे , ८) आरकम शेख, ९)तेजस पाटील, १०)सिद्धेश पिंगळे , ११)अक्षय भोईर , १२)शंकर गदई.
प्रशिक्षक :- दादा आव्हाड.
महिला संघ :- १) हरजित कौर संधू (संघणायिका), २) पौर्णिमा जेधे (उपसंघनायिका), ३)रेखा सावंत, ४)पूजा शेलार, ५)अंकिता जगताप, ६)पूजा यादव, ७)सलोनी गजमल, ८)पूजा पाटील, ९)सायली जाधव ,१०)प्रतिक्षा तांडेल , ११)अपेक्षा टाकळे, १२)सिद्धी चाळके.
प्रशिक्षक :- राजेश पाडावे,व्यवस्थापक:-सुजाता
समगिर