विश्वचषक जिंकल्यानंतर मेस्सी झाला भावुक; आईला मारली घट्ट मिठी Video Viral

    लिओनेल मेस्सीने FIFA विश्वचषक 2022 स्पर्धेच्या फायनलमध्ये अर्जेंटिना संघाला प्रतिष्ठित विजय मिळवून दिला. तब्ब्ल ३६ वर्षानंतर अर्जेंटिना संघाला विश्वविजेतेपद मिळून देण्याचे मेस्सीचे (Lionel Messi) स्वप्न अखेर पूर्ण झाले. अर्जेंटिनाच्या विजयानंतरच्या काही क्षणांमध्ये मेस्सी आणि त्याची आई सेलिया मारिया कुसिटिनी यांच्यातील एका भावनिक क्षणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

    विश्वचषक जिंकल्यानंतर मेस्सीची आई सेलिया मेस्सीला शुभेच्छा देण्यासाठी खेळपट्टीवर धावत आली. आणि तेव्हा मेस्सी तिच्याकडे पाहण्यासाठी वळला तो क्षण कॅमेऱ्यांनी टिपला. मेस्सी आईला घट्ट मिठी मारून आपल्या भावनांना वाट मोकळी केली. दोघेही या प्रसंगी भावुक झालेले पहायला मिळाले. काही वेळानंतर मेस्सीची पत्नी आणि मुले देखील मैदानावर आली. सध्या सोशल मीडियावर मेस्सीने त्याच्या आईला मारलेल्या भावनिक मिठीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेस्सीचे चाहते या व्हिडिओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.