चेन्नईचा मुंबईवर 20 धावांनी विजय, विराट कोहली सोडणार RCB चं कर्णधारपद, क्रिकेट विश्वाती घडतायत मोठ्या घडामोडी, वाचा सर्व एका क्लिकवर

आयपीएलच्या या सिजननंतर बँगलोरचा (RCB) कर्णधार राहणार नाही असे विराट कोहलीने म्हंटले आहे. आपण आरसीबीचं नेतृत्व सोडलं असलं तरीदेखील आपण शेवटपर्यंत आरसीबीसाठीच खेळू असंही विराटने स्पष्ट केलं आहे. विराटने सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली.

    कोरोनाचा प्रादुर्भाव COVID-19 वाढायला सुरुवात झाल्याने संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे IPL 2021 14 वे पर्व काल रविवारपासुन पुन्हा सुरु झाले. पहिलाच सामना IPL मधील 5 वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज MI-vs-CSK या दोन संघादरम्यान खेळविण्यात आला.

    या सामन्याची चेन्नईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय़ घेतला. सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर ऋतुराजने एकाकी झुंज देत 156 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर चेन्नईने मुंबईला 157 धावांचे आव्हान दिले. 157 धावांचे टार्गेट गाठण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. सौरभ तिवारीने अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याने अत्यंत धिम्यागतीने फलंदाजी केली ज्यामुळे तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर मुंबईचा संघ 20 धावांनी पराभूत झाला आहे.

    विराट कोहली देणार RCB चा राजिनामा

    आयपीएलच्या या सिजननंतर बँगलोरचा (RCB) कर्णधार राहणार नाही असे विराट कोहलीने म्हंटले आहे. आपण आरसीबीचं नेतृत्व सोडलं असलं तरीदेखील आपण शेवटपर्यंत आरसीबीसाठीच खेळू असंही विराटने स्पष्ट केलं आहे. विराटने सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली.

    2013 पासून विराट IPL मधील बंगलोर संघाची कप्तानी करत आहे. विराट कोहलीने यावर्षीच्या ipl मोसमानंतर बंगलोर ची कप्तानी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या स्टेटमेंटनुसार हेव्ही वर्कलोडमुळे तो बंगलोर टीमच्या कप्तानिवरून यावर्षीच्या IPL नंतर राजीनामा देत आहे.